IMPIMP

Mumbai Police | विराट कोहलीच्या मुलीवर अत्याचार करण्याची धमकी देणार्‍या ‘इंजिनिअर’च्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या;

by nagesh
Mumbai Police | mumbai police cyber cell arrested the person who threatened to rape 10 month old daughter of virat kohli and anushka sharma

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) याच्या मुलीवर अत्याचार करण्याची धमकी (Rape Threat) देणाऱ्या नराधमाला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) सायबर सेलने (Cyber cell) ही कारवाई केली असून अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीला मुंबईत आणण्यात येत आहे. रामनागेश अलीबथिनी Ramnagesh Alibathini (वय-23) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला हैदराबाद (Hyderabad) येथून अटक करण्यात आली आहे. धमकी देणारा आरोपी सुशिक्षित असून सध्या त्याचे शिक्षण सुरु आहे. यापूर्वी तो फूड डिलिव्हरी अ‍ॅपसाठी सॉफ्टवेअरचे (Software) काम करत असल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित आरोपी हा सॉफ्टवेअर इंजिनीअर (Software engineer) असल्याची माहिती मिळते.

T-20 विश्वचषकातील (T-20 World Cup) पहिल्याच सामान्यात भारताचा पाकिस्तानने (IND vs PAK) पराभव केला.
टीम इंडियाच्या पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पराभवानंतर या घटनेला धर्मिक रंग देत मोहम्मद शमीला (Mohammed Shami) ट्रोल करण्यात आले.
त्यानंतर त्याच्या समर्थनाथ अनेकजण उभे राहिले. त्यापैकी विराट कोहली एक होता.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

विराट कोहलीने शमीला पाठिंबा दिला होता. परंतु काही माथेफिरुंनी विराटलाच लक्ष्य केलं.
एवढे करुन नराधम थांबले नाहीत, तर त्यांनी ट्विटरवर विराटच्या अवघ्या 10 महिन्याच्या चिमुरडीवर बलात्कार करण्याच्या धमक्या दिल्याची माहिती समोर आली होती.
मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आता धमकी देणार्‍याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Web Title: Mumbai Police | mumbai police cyber cell arrested the person who threatened to rape 10 month old daughter of virat kohli and anushka sharma

हे देखील वाचा :

EV Charging Stations | केवळ 2500 रुपयात उघडा EV चार्जिंग स्टेशन, सरकार देतंय 6,000 रूपयांची सबसिडी; तुम्ही सुद्धा करू शकता अर्ज

Aadhaar Card | तुमच्या ‘आधार कार्ड’चा चुकीचा वापर तर होत नाही ना? ‘या’ पध्दतीनं तपासा चेक करा आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री

Mutual Fund SIP | केवळ 14,500 रुपये गुंतवून बनवू शकता 23 कोटी रुपयांचा फंड, जाणून घ्या काय करावे?

Related Posts