IMPIMP

Murlidhar Mohol Meet Raj Thackeray | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज ठाकरेंची शिवतीर्थवर भेट, पिट्याभाईनेही वेधलं लक्ष, पुण्याबाबत मनसे प्रमुखांचं मार्गदर्शन (Video)

June 22, 2024

मुंबई : Murlidhar Mohol Meet Raj Thackeray | केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी लोकसभा निवडणुकीत घेतलेली प्रचारसभा आणि पाठिंब्याबद्दल मोहोळ यांनी ठाकरे यांचे आभार मानले. यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी ठाकरे यांच्याशी पुण्याच्या विकासासंदर्भात चर्चा केली. या भेटीत राज ठाकरेंनी मार्गदर्शन केल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

राज ठाकरे यांचे पुण्यावरील विशेष प्रेम सर्वश्रुत आहे. पुण्याच्या विकासाची तळमळ त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी पुण्यात घेतलेल्या प्रचारसभेत देखील व्यक्त केली होती. यामुळेच मोहोळ यांनी आज त्यांची भेट घेतली.

लोकसभा निवडणुकीत मुरलीधर मोहोळ मोठ्या मताधिक्याने विजयी होऊन खासदार झाले आणि त्यांना केंद्रातील मोदी ३.० सरकारमध्ये राज्यमंत्रीपद देखील मिळाले आहे. यानंतरची ही भेट महत्वाची मानली जात आहे. या भेटीच्या वेळी मोहोळ यांच्यासोबत अभिनेता रमेश परदेशी (Ramesh Pardeshi) देखील होता. (Pitya Bhai)

आज राज ठाकरे यांच्या भेटीच्या वेळी मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत असलेले मुळशी पॅटर्नमध्ये पिट्या भाईची भूमिका साकार करणारे अभिनेते रमेश परदेशी यांनीही अनेकांचे लक्ष वेधून घेतले.