IMPIMP

NDA Govt | केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यातील 6 मंत्र्यांकडे ‘ही’ खाती येण्याची शक्यता

by sachinsitapure

मुंबई: NDA Govt | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशाच्या पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा रविवारी शपथ घेतली. यावेळी त्यांनी स्थापन केलेल्या ७२ जणांच्या मंत्रीमंडळात महाराष्ट्रातील सहा नेत्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून नितीन गडकरी (Nitin Gadkari), मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), पीयूष गोयल (Piyush Goyal), रक्षा खडसे (Raksha Khadse), प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav), रामदास आठवले (Ramdas Athawale) यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात जातीय आणि प्रांतीय समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे.

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राला केवळ सहा मंत्रीपदं देण्यात आली आहेत. त्यात दोन कॅबिनेट आणि चार राज्यमंत्रिपदांचा समावेश आहे.राज्यातील या नेत्यांना कोणती खाती मिळणार याबाबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी विश्लेषण केले आहे त्यानुसार नितीन गडकरी यांच्याकडे पुन्हा एकदा रस्ते वाहतूक विभागाचाच पदभार सोपवण्यात येईल अशी शक्यता आहे. पियुष गोयल यांच्याकडे वाणिज्य मंत्री अथवा वस्त्रोद्योग मंत्रालय किंवा पेट्रोलियम मंत्रालयाचा पदभार दिला जाण्याची शक्यता आहे. महिला आणि बालविकास राज्यमंत्री पदाची जबाबदारी रक्षा खडसे यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

कुस्तीगीर असलेल्या मोहोळ यांच्याकडं क्रीडा आणि युवक कल्याण या खात्याच्या राज्यमंत्रिपदाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षाच्या परंपरेनुसार या पक्षाकडे अवजड उद्योग या खात्याच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. रामदास आठवले गेल्या दोन टर्मपासून असलेल्या सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाचीच धुरा पुन्हा एकदा त्यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे.

Related Posts