IMPIMP

Parambir Singh | परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढ; मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यातील गुन्हाही सीआयडीकडे?

by nagesh
parambir singh | fourth summons to parambir singh for present front of chandiwal commission

मुंबई न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन –  Parambir Singh | भाईंदर येथील बिल्डर श्यामसुंदर अग्रवालकडून कोट्यवधींची रोकड व स्थावर मालमत्ता बळकावल्याप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (former mumbai police commissioner parambir singh) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. आता गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे (crime investigation department-CID) वर्ग करण्यात येणार आहे. तशा हालचालीही सुरु झाल्या आहेत. अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारमधील बड्या मंत्र्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांची चौकशी व सरकार पाडण्याचा कटया प्रकरणातील सहआरोपी व परमबीर यांचा निकटवर्तीय संजय पुनमिया याने रचल्याचा तसेच परमबीर यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा तक्रारदाराचा दावा केला आहे. त्यामुळे सरकरने या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करणार आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

21 जुलैला परमबीर यांचे निकटवर्तीय पुनामिया (Punamia), सुनील जैन (Sunil Jain), उपायुक्त अकबर पठाण (Deputy Commissioner of Police Akbar Pathan), एसीपी श्रीकांत शिंदे (ACP Shrikant Shinde), वरिष्ठ निरीक्षक आशा कोकरे (Senior Inspector Asha Kokare),
नंदकुमार गोपाळे (Nandkumar Gopale), एसीपी संजय पाटील (ACP Sanjay Patil) यांच्यावर ‘मोक्का’च्या गुन्ह्यातील आरोपी असल्याने अग्रवाल याच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे.
त्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी आयुक्त हेमंत नगराळे यांनी एसआयटी नेमली होती.
या पथकात उपायुक्त निमित गोयल यांच्या नेतृत्वाखाली व तपास अधिकारी एसीपी एम. एम. मुजावर यांच्यासह 7 अधिकाऱ्यांचा समावेश होता.
मात्र या प्रकरणाला राजकीय व अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याने सीआयडीकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परमबीर सिंग यांच्या विरोधात आतापर्यंत केवळ चार गुन्हे दाखल आहेत.
त्यापैकी एक सीआयडी व दोन ठाणे आयुक्तालयाकडे आहेत.
मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात दाखल गुन्हाही सीआयडीकडे वर्ग होईल.
अकबर पठाण यांना न्यायालयाचा दिलासा उपायुक्त अकबर पठाण यांनी प्राथमिक चौकशी न करता आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
या प्रकरणात आपल्याला बळीचा बकरा बनविल्याचा दावाही पठाण यांनी केला आहे.
न्यायालयाने पुढील सुनावणी होईपर्यंत त्यांच्यावर कारवाई न करण्याची सूचना पोलिसांनी केली आहे.
पुढील सुनावणी 25 ऑगस्टला होणार आहे.

Web Title : Parambir Singh | cid probe parambir singh government decision?

हे देखील वाचा :

Honey Trap Racket Pune | ‘हनी ट्रॅप’ करणार्‍या तरुणीने मांजरीतील तरुणालाही 20 लाखांना लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार उघड

Corona Vaccine | अलर्ट ! कोरोना व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 10 लक्षणे दिसताच व्हा सावध, धोक्याचा आहे संकेत

Pune Crime | उद्योजक नानासाहेब गायकवाडचा आणखी एक ‘कारनामा’ ! बंदुकीतून 3 गोळ्या झाडून जबरदस्तीने ‘मर्सिडीज’ केली नावावर

Related Posts