IMPIMP

Parambir Singh | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, खंडणीचा आणखी एक गुन्हा

by bali123
Parambir Singh | home minister walse patil likely to give investigation orders on parambir singh and sachin waze meet

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Parambir Singh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर सचिन वाझे याच्यामार्फत महिना १०० कोटी रुपयांचा हप्ता गोळा केला जात असल्याचा सनसनाटी आरोप करुन माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी खळबळ उडवून दिली होती. आता त्याच परमबीर सिंग (Parambir Singh) व सचिन वाझे (sachin waze) यांच्यासह ६ जणांवर व्हॉटेल व्यावसायिकाकडून ११ लाख ९२ हजार रुपयांचा हप्ता वसुल केल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा शुक्रवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आला आहे.

परमबीर सिंग, सचिन वाझे, सुमित सिंग ऊर्फ चिंटु, अल्पेश पटेल, विनय सिंग ऊर्फ बबलु आणि रियाज भाटी अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बिमल अग्रवाल (वय ४८, रा. गोरेगाव) यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अग्रवाल याने आपल्या १० पानी जबाबात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

बिमल अग्रवाल (bimal agarwal) हे अंधेरीमधील बोहो रेस्टारंट अँड बार मध्ये भागीदार आहेत.
हे हॉटेल चालविण्यासाठी व त्या करीता पोलिसांकडून कोणताही त्रास होणार नाही.
अशी भिती दाखवून त्यापोटी ९ लाख रुपये तसेच सॅमसंग कंपनी फोल्ड २ मॉडेलचे दोन मोबाईलचे २ लाख ९२ हजार रुपये असे ११ लाख ९२ हजार रुपयांची खंडणी स्वरुपात घेतलेले आहेत.
जानेवारी, फेब्रुवारी ते मार्च २०२१ दरम्यान हा प्रकार घडला आहे.
तसेच हॉटेलवाल्यांकडून आणि बुकीवाल्यांकडून जबरदस्तीने हप्ते वसुल केल्याचे मला समजले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलीस आयुक्तांच्या नियुक्तीची अगोदरच माहिती असल्याचा गौप्यस्फोट

परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होणार असल्याची माहिती सचिन वाझे याला अगोदरच होती.
व त्यांची नियुक्ती झाल्यानंतर आपल्याला पुन्हा पोलीस सेवेत घेणार असून कलेक्शनचे काम माझ्याकडेच येणार आहे,
असे सचिन वाझे याने जानेवारी फेब्रुवारी २०२० मध्येच फिर्यादी यांना सांगितले होते.
त्यानुसार ३१ मार्च २०२० रोजी परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली व त्यानंतर सचिन वाझे याला पुन्हा पोलीस सेवेत घेण्यात आले.
तसेच वसुलीचे कामही त्याच्याकडे सोपविल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title :- Parambir Singh | former mumbai police commissioner parambir singhs troubles escalate another ransom case

Cyber Fraud मध्ये फसवणूक झालेल्या लोकांना 24 तासात परत मिळतील पैसे, जाणून घ्या पद्धत

Gold Price Today | सोन्याच्या दरात तेजी तर चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या

RBI Decision Dry ATMs | जर ATM मध्ये तुम्हाला मिळाली नाही कॅश तर ‘या’ नंबरवर करा फोन, RBI संबंधित बँकेकडून घेईल 10 हजारांचा दंड; जाणून घ्या 

Related Posts