IMPIMP

Parambir Singh | सचिन वाझेच्या ‘कोड’चा हॉटेल मालकाने केला उलगडा; ‘नंबर वन’ म्हणजे परमबीर सिंग

by nagesh
Parambir Singh | home minister walse patil likely to give investigation orders on parambir singh and sachin waze meet

मुंबई न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन Parambir Singh | माजी आयुक्त परमबीर सिंग (mumbai former police commissioner parambir singh) आणि बडतर्फ एपीआय सचिन वाझेने (api sachin waze) यांनी ‘नंबर वन’ म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना संबोधले असल्याचे विरोधकांकडून वारंवार सांगितले जात होते. मात्र आता तक्रारदार हॉटल मालक बिमल अग्रवाल यांनी दिलेल्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाझे वसुलीवेळी ‘नंबर वन’चा जो उल्लेख करत होते ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून परमबीर सिंग हेच असल्याबद्दल पुष्टी मिळत आहे. नंबर वन म्हणजे सीपी परमबीर साहेबच, असे वाझेने आपल्याला स्पष्ट करून सांगितले होते, असा दावा अग्रवाल यांनी केला आहे. त्यासंदर्भातील वाझेसोबतच्या संभाषण व बैठकीतील रेकॉर्डिंगच्या क्लिप सादर केल्या आहेत. त्यामुळे आता राज्याच्या पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

हॉटेलचालक, बुकी व बीएमसी कॉन्ट्रॅक्टरर्सकडून हप्ता वसुली करण्यासाठी सचिन वाझे हा अग्रवाल यांच्या मागे लागला होता. जानेवारी 2020 ते मार्च 2021 या कालावधीत वाझे हा अग्रवाल यांना भेटण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवरून वारंवार संपर्क करत होता. सीआययू, युनिट -11च्या कार्यालयात वाझे त्यांना बोलवत असे. तर काहीवेळा अग्रवाल यांच्या मर्सिडीजमध्ये बसून चर्चा करीत असत. वाझेने 31 ऑगस्ट 2020 रोजी अग्रवाल यांना यूनिट 11 मध्ये बोलावून घेतले होते. त्यावेळी वाझेने त्यांना सांगितले की एक नंबरची कोरोनामुळे 6 महिने कमाई झालेली नाही, त्यामुळे त्यांनी 2 कोटींची वसुली करण्यास सांगितले. खात्री करण्यासाठी अग्रवाल यांनी एक नंबर म्हणजे कोण? असे विचारल्यावर वाझेने सीपी परमबीर सिंग, असे स्पष्ट सांगिल्याचा दावा त्यांनी केला आहे.

हॉटेल, बीएमसी कंत्राटदारांबरोबर सेटिंग झाल्याबरोबर तुम्हाला एक नंबरकडे घेऊन जातो. पेंडिंग प्रकरणे संपवून टाकू असे आश्वासनही वाझेने दिले होते. त्यानंतर मात्र या कामातून त्याने हात झटकून घेतला असल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात तपासी अधिकार्‍यांना अग्रवाल यांनी जवळपास 70 क्लिप्स दिल्या आहेत.

दरम्यान, अग्रवाल यांनी क्रिकेट बुकीकडून वसुली करण्यासाठी महेश भाई व मन्नन नायक यांची वाझेशी भेट घालून दिली होती.
मात्र, त्याच्याकडून सेटलमेंट होऊ शकली नाही त्यामुळे 8 सप्टेंबर 2020 ला धवल जैन नावाच्या बुकीवर छापा टाकला.
त्या गुन्ह्यात अन्य बुकींना फरारी आरोपी दाखवून त्यांच्याकडून मोठी वसुली केली.
ज्यांनी काही दिले नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते.
नायक याच्याकडे वाझेने 2 कोटीची मागणी केली होती.
या प्रकरणात आता नवनवीन धक्कादायक अशी माहिती समोर येऊ लागली आहे.

Web Title : parambir singh | number one parambir singh unravel sachin wazes code hotel owner

हे देखील वाचा :

Royal Enfield Bullet 350 | फक्त 15 हजार देऊन घरी आणा रॉयल एनफिल्ड बुलेट 350, इतका द्यावा लागेल मासिक EMI; जाणून घ्या

Gulabrao Patil | गुलाबराव पाटलांची केंद्रीय मंत्र्यावर खरमरीत टीका, म्हणाले – ‘नारायण राणेंना सूक्ष्म उद्योग खातं मिळालं आणि त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं’

Pune Crime | पुण्यात नात्याला काळिमा फासणारी घटना ! मुलांनी जन्मदात्या आईला लाथा-बुक्क्यांनी केली मारहाण, जाणून घ्या प्रकरण

Related Posts