IMPIMP

Parambir Singh | राज्य सरकारला ‘सुप्रीम’ झटका ! परमबीर सिंह यांच्याविरुद्धचे सर्व प्रकरणे CBI कडे, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

by nagesh
Parambir Singh | param bir singh all cases transferred to cbi for impartial probe says Supreme Court

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Parambir Singh | मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्या विरोधात
महाराष्ट्रात विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेली सर्व प्रकरणं सीबीआयकडे (CBI) वर्ग करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिले
आहेत. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारला (Maha Vikas Aghadi Government) एक मोठा झटका बसला आहे. तसेच, परमबीर यांचे
निलंबन कायम राहणार असल्याचंही सुप्रीम कोर्टाने सांगितलं. या प्रकरणात नवी एफआयआर (FIR) दाखल झाल्यास त्याचा तपास देखील CBI च करणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) म्हटलं आहे की, ”या प्रकरणांची नि:पक्ष चौकशी होणे अपेक्षित असल्याचं नमुद केलं आहे. यावेळी न्यायालयाने गृहमंत्री आणि आयुक्त जेव्हा अशा प्रकारचे आरोप एकमेकांवर करतात तेव्हा लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास उडतो. यासाठी सत्य समोर येणे आवश्यक असून त्यासाठी परमबीर सिंह (Parambir Singh) यांचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.”

दरम्यान, परमबीर सिंह यांनी लेटर बॉम्ब टाकत शंभर कोटींच्या वसुलीचा खळबळजनक आरोप केला होता. परमबीर सिंह यांनी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या विरोधात 100 कोटी वसूली आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या आरोपाने राज्यात एकच खळबळ उडाली होती.

Web Title :- Parambir Singh | param bir singh all cases transferred to cbi for impartial probe says Supreme Court

हे देखील वाचा :

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ‘तो’ फोटो केला ट्विट, राज्याच्या राजकारणात खळबळ

CM Uddhav Thackeray | राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून ज्येष्ठ मंत्र्यांचा काढता पाय; मुख्यमंत्री ठाकरेंची मार्मिक शब्दात टिप्पणी

Supreme Court Order To Modi Government | ‘कोरोना’ मृतांच्या कुटुंबियांना 60 दिवसांत मदत द्या, सर्वोच्च न्यायालयाचे मोदी सरकारला आदेश

Related Posts