IMPIMP

NCRB Women Violence Report | NCRB : महिलांवरील लैंगिक अत्याचारात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर

by nagesh
Pune Crime News | Woman molested by threat to implicate husband in false crime, Sarait criminal FIR; Incidents in Kondhwa area

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन NCRB Women Violence Report | नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (National Crime Records Bureau-NCRB) अहवालातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील काही वर्षात देशातील महिलांवरील अत्याचारामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं दिसत आहे. अशातच आता महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्र (Maharashtra) चौथ्या क्रमांकावर असल्याची माहिती एनसीआरबी अहवालामधून पुढे आली आहे. तसेच, या अहवालानुसार अत्याचारांच्या घटनांमध्ये राजस्थान (Rajasthan) राज्य प्रथम क्रमांकावर आहे. यामुळे राज्यातीलच नाही तर देशातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, पुणे आदी शहराचाही यामध्ये समावेश आहे. तसेच, देशात महिलांसंदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्यांत मुंबई शहराचा पहिल्या पाचमध्ये नंबर लागला आहे. मुंबईत साडेचार हजारांवर गुन्ह्यांची तर नागपूरमध्ये 920 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. देशातील 19 महानगरांत महिलांविरुद्ध घडलेल्या अन्याय-अत्याचारांबाबत दाखल गुन्ह्यांचे सर्वेक्षणातून (NCRB Women Violence Report) ही बाब समोर आलीय.

महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ होत असून इतर राज्यातही त्याचे प्रमाण वाढले आहे.
त्याचबरोबर महिलांवरील अत्याचार आणि इतर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यात केली आहे.
2020 साली युपीत 49 हजार 385 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
तसेच पश्चित बंगाल (West Bengal) दुस-या क्रमांकावर आहे. येथे 36 हजार 439 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

Web Title :- PNCRB Women Violence Report | maharashtra on number four position in crime against woman sexual violence ncrb report

हे देखील वाचा :

Maharashtra Rains Update | राज्यात पावसाचा जोर कमी; पूरस्थिती भागातील नागरिकांना दिलासा, शेतीच्या कामांना गती

RBI करणार आहे मोठी घोषणा ! येथे जमा केलेल्या पैशावर मिळेल मोठा फायदा, जाणून घ्या कसा

Presidential Election | द्रौपदी मुर्मू यांचा विजय, राष्ट्रपतीपदावर पहिल्या आदिवासी महिला विराजमान

Related Posts