IMPIMP

Police Officers Transfer | पनवेल-नवी मुंबईत 600 हून अधिक पोलिसांच्या अंतर्गत बदल्या

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

नवी मुंबई (New Mumbai): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Police Officers Transfer | पनवेल (Panvel) आणि नवी मुंबईत (Navi Mumbai) पाच वर्षापेक्षा अधिक कार्यकाळ पूर्ण केलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदली (Police Officers Transfer) करण्यात आली आहे. 600 हून अधिक पोलिसांची आयुक्तालयाच्या अंतर्गत बदली (Police Officers Transfer) करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील 646 कर्मचाऱ्यांची बदली राज्य शासनाच्या (State Government) आदेशानुसार करण्यात आली आहे. सरकारच्या आदेशानुसार नवी मुंबई पोलीस आस्थापना मंडळाने (police establishment board, Navi Mumbai) पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदलीचा निर्णय घेतला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

बदली करण्यात आलेल्यांमध्ये पोलीस ठाणे (Police Station), नियंत्रण कक्ष (Control Room), पोलीस मुख्यालय (Police Headquarters), वाहतूक शाखा (Traffic Branch), गुन्हे शाखा (Crime Branch), आरबीआय (RBI), अतिक्रमण आणि विशेष शाखेतील (Special Branch) पोलिसांचा समावेश आहे. गेल्या दोन दिवसांपासून या बदली प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक (Service book) तपासणी करण्यात आली होती. यामध्ये ज्या पोलीस कर्मचाऱ्याने 5 वर्षापेक्षा अधिक कालावधी पूर्ण केला आहे. अशा 646 कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली. त्यावर पोलीस आयुक्तालयातील आस्थापना मंडळाच्या निर्णयानुसार या बदल्या बुधवारी (दि.28) रात्री पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह (Commissioner of Police Bipin Kumar Singh) यांनी केल्या.

कोणा-कोणाची झाली बदली ?

बुधवारी रात्री करण्यात आलेल्या 646 पोलिसांच्या सार्वत्रिक बदल्यांमध्ये 646 जणांचा समावेश आहे. यामध्ये सहायक पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस शिपाई यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये 47 सहायक पोलीस उप निरीक्षक, 195 पोलीस हवालदार, 209 पोलीस नाईक, 195 पोलीस शिपाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

10 टक्के बदल्या ऑगस्टमध्ये

पोलीस आयुक्तांनी बदली केल्यानंतर राज्य सरकारने जुना 15 टक्के बदल्यांचा आदेश रद्द करुन नवीन आदेश काढला.
नवीन आदेशानुसार 25 टक्के बदल्या करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
त्यामुळे उर्वरीत 10 टक्के पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या ऑगस्टमध्ये करण्यात येणार आहे.
ऑगस्टमध्ये आणखी 150 ते 200 कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.

औरंगाबादमध्ये 560 जणांची बदली प्रक्रिया पूर्ण

पनवेल आणि नवी मुंबईत पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर आता औरंगाबाद शहर पोलीस दलात बदलीचे वारे वाहू लागले आहे.
औरंगाबाद शहर पोलीस (Aurangabad City Police) दलातील 809 पोलीस कर्मचाऱ्यांपैकी 560 जणांच्या बदलीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
शहर पोलीस दातील हवालदार ते सहायक फौजदारांच्या बदल्या करण्यास सुरुवात झाली आहे.
तीन पसंतीच्या ठिकाणापैकी एका जागी त्यांची बदली केली जात आहे.
तर गृह मंत्रालय आणि पोलीस महासंचालक कार्यालयातून पोलीस आयुक्तांपासून ते अधीक्षक,
उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, निरीक्षकांची बदली होणार आहे.

Web Title : Police Officers Transfer | navi mumbai panvel navi mumbai police officers transfer order

हे देखील वाचा :

Real Estate in Pune | पुण्यात रियल इस्टेटला येणार सुगीचे दिवस; झानडू रियल्टीची प्रतिष्ठित नाईकनवरे डेव्हलपर्सशी भागीदारी

Indian Oil | इंडियन ऑईलची जबरदस्त ऑफर ! ‘डिझेल भरा, बक्षिसं जिंका’ ऑफरमधून 2 कोटी जिंकण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या ऑफर

Indian players । भारतीय संघाचे खेळाडू यजुर्वेंद्र चहल, कृष्णप्पा गौथम यांना करोनाची लागण

Related Posts