IMPIMP

Rain in Maharashtra | आगामी 24 तासांत राज्यातील ‘या’ जिल्हयांमध्ये मुसळधार तर काही ठिकाणी ‘धो-धो’

by nagesh
Weather Update | temperature rise in vidarbha rainfall possibilities in konkan imd report today

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Rain in Maharashtra | विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा राज्याला झोडपून काढलं आहे. मागील दोन दिवसापासून महाराष्ट्रात (Rain in Maharashtra) जोरदार पावसाने मुसंडी मारली आहे. राज्यात विदर्भ, कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात या भागात पावसाच्या सरी कोसळल्या आहे. आज देखील राज्यात पावसाची स्थिती अशीच राहिली आहे. दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्हे सोडून आज (मंगळवार) राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने (India Meteorological Department) दिला आहे. दरम्यान आगामी 24 तासामध्ये (In 24 hours) महाराष्ट्रात अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार तर काही भागात जोरदार पाऊस बरसणार आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मागील दोन दिवस राज्यात (Rain in Maharashtra) अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं (Heavy to very heavy rainfall) हजेरी लावली आहे. मात्र, आज मुंबईसह पालघर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांत आगामी 24 तासांत पावसाचा धुमाकूळ होण्याची शक्यता हवामान खात्याकडून (India Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव, पालघर आणि नंदुरबार या जिल्ह्यांना सर्वाधिक धोका आहे. पालघर वगळता संबंधित जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी करण्यात आला आहे. तसेच, पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. या भागात जोरदार पाऊस कोसळणार असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, पुणे, अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच, औरंगबादसह मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात हवामान खात्याकडून येलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे. विदर्भातील सर्वचं जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळणार आहे.
तसेच, याठिकाणी वाऱ्याच्या झोतात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दक्षिण महाराष्ट्रातील 8 जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
या दरम्यान, उद्या मात्र महाराष्ट्रात पावसाची गती कमी होण्याची शक्यता आहे.
उद्या मुंबईसह उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

Web Title : Rain in Maharashtra | heavy rainfall alert to maharashtra for next 24 hours imd give orange and red alert to 6 districts

हे देखील वाचा :

GAD Mumbai Recruitment 2021 | सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! सामान्य प्रशासन विभाग मुंबईत विविध पदांसाठी भरती; पगार 2 लाखांपर्यंत

Pune Court | खून प्रकरणात एकाचा जामीन फेटाळला

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 243 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts