IMPIMP

Riteish Deshmukh | लातूरच्या बाभळगावमधील रितेशचा खास मित्र; भावनिक पोस्ट करत रितेश म्हणाला…

by nagesh
Riteish Deshmukh | Actor riteish deshmukh wishes his best childhood friend on his birthday photo viral

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Riteish Deshmukh | मराठी आणि हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) अनेक कारणामुळे चर्चेत असतो. रितेश याचे अनेक हिंदी सिनेमा गाजले आहेत. त्याचा फेमस चित्रपट आणि सर्वानां आवडता चित्रपट म्हणजे ”तुझे मेरी कसम” या चित्रपटाने खरंतर रितेश देशमुख अधिक चर्चेत आल्याचं दिसलं. त्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटातही अग्रेसर झाला. दरम्यान, नुकतंच रितेशने सोशल मिडियावर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमधून मित्रत्वाचं नातं कसं असतं हे स्पष्ट दिसतं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

लातुरच्या बाभळगावमधील (Babhalgaon) एका खास मित्रासोबतचा फोटो रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) पोस्ट केला आहे. प्रकाश इरेकर
(Prakash Irekar) असं त्याच्या या मित्राचं नाव आहे. त्याचा वाढदिवस (Birthday) असल्याच्या कारणाने रितेशनं हा फोटो सोशल मिडियावर शेअर
केला आहे. ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रकाश इरेकर. हा बाभळगाव, लातूर या माझ्या गावातील माझा खास मित्र. अनेक वर्ष उलटली, पण आमची मैत्री मात्र कायम तिथेच तग धरुन राहिलीये’, अशी एक भावनिक पोस्ट रितेशने केली आहे.

जीवनाच्या पटलावर जगत असताना कोण किती पुढे जातो. आणि कोण कुठे लवकर पुढे जातो. मात्र मागे राहिलेली मैत्री मात्र सोबत घेऊन जाणे अथवा त्या मित्रत्वाला न विसरणे हे महत्वाचे असते. रितेशसाठी प्रकाश इरेकर हा त्याचा मित्र अशाच व्यक्तींपैकी एक आहे. हे रितेशने केलेल्या पोस्टवरुन दिसते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : Riteish Deshmukh | Actor riteish deshmukh wishes his best childhood friend on his birthday photo viral

हे देखील वाचा :

Ration Card | रेशन कार्डमध्ये जोडू शकता नवीन नाव, ‘ही’ आहे सर्वात सोपी पद्धत

Ram Kadam | ‘शरद पवार संविधानाला डावलून मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात ?’

Sanjay Raut | गोव्यात महाविकास आघाडी एकत्र का लढणार नाही? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं कारण

Related Posts