IMPIMP

Sanjay Raut On Raj Thackeray | राज ठाकरे यांनी स्वतःच्या पक्षासाठी इतकी मेहनत घेतली असती तर…, संजय राऊतांचा मनसेवर हल्लाबोल

by sachinsitapure

मुंबई : Sanjay Raut On Raj Thackeray | ईशान्य मुंबईत राज ठाकरे, नारायण राणे आणि इतर नेते रस्त्यावर उतरले आहेत. खरंतर आम्हीच त्यांना रस्त्यावर उतरवले आहे. ही मंडळी आज भाजपासाठी घाम गाळत आहेत. राज ठाकरे यांनी स्वतःच्या पक्षासाठी इतकी मेहनत घेतली असती तर त्यांच्या कार्यकत्र्यांना आज चांगले दिवस आले असते. भाजपाने (BJP) त्यांच्यासह अनेकांना भाड्याने घेतले आहे, असा हल्लाबोल आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, मागील लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे म्हणत होते की नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका. तेच राज ठाकरे आज भाजपाच्या पखाल्या वाहत आहेत हे पाहून आम्हाला खूप वाईट वाटते.

राज ठाकरे ज्या धनुष्यबाणाला मतदान करणार आहेत तो डुप्लिकेट आहे, तो शिवसेनेचा, बाळासाहेब ठाकरेंचा धनुष्यबाण नाही. तो धनुष्यबाण चोरलेला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे चोरीच्या मालावर हक्क सांगत आहेत आणि राज ठाकरे त्या चोरीच्या मालाचं चुंबन घेत आहेत. ते नकली ओठ आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.

संजय राऊत पुढे म्हणाले, आम्ही आज काँग्रेसच्या पंजाला मतदान करत आहोत. हा पंजा त्याच काँग्रेसचा आहे, ज्या काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्वाधिक योगदान दिले. ज्या कमळाबाईला आम्ही २५ वर्षे मत देत होतो, त्याच कमळाबाईने या देशाची वाट लावली आहे, महाराष्ट्र लुटला. त्यामुळेच आम्हाला महाविकास आघाडी म्हणून एकत्र येऊन हा देश आणि या देशाचे संविधान वाचवायचे आहे.

Wanwadi Pune Crime News | पुणे : मानसोपचार डॉक्टर कडून महिला डॉक्टरसोबत असभ्य वर्तन

Related Posts