Santosh Deshmukh Murder Case | सरपंच देशमुख खूनप्रकरणातील फरार आरोपीबाबत संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा, कृष्णा आंधळे जिवंत….

मुंबई : Santosh Deshmukh Murder Case | बीड मधील अनेक प्रकरणं समोर येणार आहेत. लोक स्वतःहून पुढे येऊन बोलत आहेत. मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील चौथा आरोपी कृष्णा आंधळे आता जिवंत नसेल असा मला संशय आहे, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते संदीप क्षीरसागर यांनी केला आहे.
आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले, प्रशासनाला मोकळेपणाने संतोष देशमुख खून प्रकरणाचा तपास करायचा असेल, तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे. पहिल्यांदाच हा विषय बाहेर आला आहे, आणि जर एखाद्या व्यक्तीला पकडायचे ठरवले तर तो 24 तासात सापडतो. त्यामुळे कृष्णा आंधळे याच्या जीवाशी घातपात झाला असावा, असा संशय आहे.
संदीप क्षीरसागर म्हणाले, एखादा विषय अंगलट येतो तेव्हा तो माणूस गायब होतो, आणि मला वाटत नाही की हा माणूस सापडेल. दादाचा स्वभाव असा आहे की चुकीची गोष्ट त्यांना कधीच पटत नाही.
क्षीरसागर म्हणाले, गुन्हा नोंदवायला दहा-बारा तास उशीर झाला आणि ज्यांनी हा विलंब केला, त्यांच्यावर डीसीआर मिळाल्यावर कारवाई होईल. लोकांनी स्वतःहून रस्त्यावर उतरून या प्रकरणात आवाज उठवला आहे. अन्याय झालेल्या लोकांनी पुढे येऊन बोलायला सुरुवात केली आहे.
दरम्यान, संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य फरार आरोपी कुष्णा आंधळे याच्यावर 2023 मध्येही हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला होता. तरी त्याला अटक झाली नव्हती. मागील चार वर्षांत त्याच्यावर सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
आंधळे याच्यावर धारूर, आंबाजोगई, आणि केज पोलीस ठाण्यांमध्ये खंडणी, मारामारी, आणि खुनाचे प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
Comments are closed.