IMPIMP

Sonakshi Sinha Wedding | सोनाक्षी सिन्हा विवाहानंतर धर्मपरिवर्तन करणार का? भावी सासरे आणि जहीरचे वडील म्हणाले…

by sachinsitapure

मुंबई : Sonakshi Sinha Wedding | सध्या बॉलीवुडमध्ये सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबाल यांच्या विवाहाची जोरदार चर्चा आहे. दोघांचा विवाह अंतरधर्मीय असल्याने सोनाक्षी-जहीरपेक्षा लोकांनाच जास्त प्रश्न सतावत आहेत. मिया-बीबी राजी आहेत, स्वता शत्रुघ्न सिन्हा यांनीही भावी जावई जहीरला प्रेमाने जवळ घेत कुटुंबं देखील राजी असल्याचे दर्शवले होते. आता सोनाक्षी लग्नानंतर धर्मपरिवर्तनही करणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. या प्रश्नाला जहीरचे वडील रतनसी इकबाल यांनी उत्तर दिले आहे.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना रतनसी इकबाल म्हणाले, सोनाक्षी धर्म बदलणार नाही हे तर निश्चित आहे. दोघंही मनाने जोडले गेले आहेत. यामध्ये धर्माचा प्रश्नच येत नाही. माझा केवळ माणूसकीवर विश्वास आहे. हिंदू लोक देवाला मानतात तर मुस्लिम अल्लाह. पण शेवटी आपण सगळे आधी माणूस आहोत. माझा आशीर्वाद जहीर आणि सोनाक्षीसोबत कायम आहे.

रतनसी इकबाल यांचा मुंबईत दागिन्यांचा व्यवसाय असून ते रिअल इस्टेट आणि एंटरटेनमेंट सेक्टरमध्ये सुद्धा गुंतवणूक करतात. २००५ साली त्यांनी रियल इस्टेट कंपनी सुरु केली. यानंतर त्यांनी आणखी दोन कंपन्या सुरु केल्या.

रतनसी इकबाल यांनी कोरोना काळात मीडिया आणि इंटरनेट कंपनी सुरु केली. दबंग अभिनेता सलमान खानचे ते खास मित्र आहेत. सलमान त्यांना पर्सनल बँक म्हणतो. रतनसी यांनी सलमानला दोन हजार अकरा रुपये उधार दिले होते जे सलमानने आजपर्यंत परत केलेले नाहीत. सलमाननेच ही माहिती सोशल मीडियावर दिली होती.

Related Posts