Sunil Tatkare On Rahul Solapurkar | राहुल सोलापुरकारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुनील तटकरे संतापले, ’विकृत मनोवृत्ती ठेचून काढणे गरजेचे’

मुंबई : Sunil Tatkare On Rahul Solapurkar | टकलू हैवान या मराठी चित्रपटातील भूमिकेमुळे सर्वपरिचित असलेले अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेबाबत केलेल्या आक्षपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद सध्या सर्वत्र उमटत आहेत. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अशी विकृत मनोवृत्ती ठेचून काढणे गरजेचे आहे, असे तटकरे यांनी म्हटले आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj)
आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार सुनील तटकरे म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याच्या शौर्याबद्दल राहुल सोलापूरकर नावाच्या विकृत मनोवृत्तीने भाष्य केले आहे. अशा या विकृत मनोवृत्ती ठेचून काढणे आवश्यक आहे.
सुनील तटकरे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र नव्हे तर देशाची अस्मिता असलेले छत्रपती शिवराय मिर्झाराजे यांच्या आग्रहाखातर दिल्लीला गेले. असा पूर्ण इतिहास पाहतो. ही जी काही मनोवृत्ती आहे, स्वत: कोण किती पात्रतेचे आहे. काय आहेत, तो भाग वेगळा आहे. पण, छत्रपती शिवराय यांच्याबद्दलचे जे काही वक्तव्य केले आहे ते अत्यंत निंदनीय आहे, अशा मनोवृत्ती ठेचून काढणे गरजेचे आहे.
काय आहे प्रकरण
काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांची ‘मुक्काम पोस्ट मनोरंजन’ या युट्यूब चॅनेलवर अभिनेत्री रिमा अमरापूरकर यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत राहुल सोलापूरकर म्हणाले, पेटारे-बिटारे असे काहीच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवला याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत.
शिवाजी महाराजांबाबत सोलापूरकर यांनी म्हटले की, शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर व त्याच्या बायकोला देखील लाच दिली होती. मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचे अधिकृत पत्र महाराजांनी घेतले होते. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले.
महाराजांच्या आग्र्याहून सुटकेबाबत सोलापूर पुढे म्हणाले की, सर्वात शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले. त्याची खून व पुरावे देखील आहेत. परमानंदांकडे देखील परवानगी होती. मात्र हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हटले की थोडे रंग भरावे लागतात. मात्र रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो.
राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. याच प्रकरणावर राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी ही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Comments are closed.