IMPIMP

Thane Crime | धक्कादायक ! अनिधकृत फेरीवाल्याचा पालिका सहाय्यक आयुक्तांवर चाकूने हल्ला, हाताची 3 बोटं छाटली

by nagesh
thane-crime-vegetable-seller-attacks-assistant-commissioner-3-fingers-cut-incident-in-thane

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाइन Thane Crime | अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या माजिवडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळे (Assistant Commissioner, Majivada Division Kalpita Pingale) यांच्यावर भाजी विक्रेत्याने जीवघेणा हल्ला (Vegetable seller attacks) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भाजी विक्रेत्याने पिंगळे यांच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात पिंगळे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या हाताची तीन बोटे तुटली (3 fingers cut) आहे. तसेच त्यांच्या डोक्याला देखील गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना सोमवार (दि.30) सायंकाळी साडेसहाच्या (Thane Crime) सुमारास घडली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अमरजीत यादव (Amarjit Yadav) (वय-45) असे हल्लेखोराचे नाव आहे. फेरीवाल्याच्या या हल्ल्यात रक्तबंबाळ झालेल्या कल्पिता इंगेळे यांना
तातडीने ठाण्यातील वेदांत रुग्णालयात (Vedanta Hospital Thane) दाखल करण्यात आले. परंतु त्यांना गंभीर दुखापत झाल्याचे लक्षात येताच त्यांना तातडीने ज्युपिटर रुग्णालयात (Jupiter Hospital) हलवण्यात आले. पिंगळे यांच्यावर हल्ला होत असल्याचे लक्षात येताच त्यांच्या अंगरक्षकाने (Bodyguard) त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने त्यांच्यावरही हल्ला करुन गंभीर जखमी केले.

ठाण्यातील कासारवडवली येथील मुख्य जंक्शनवर अनधिकृत फेरीवाल्यांचा सुळसुळाट आहे. त्याविरोधात पालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळे यांनी मोहीम हाती घेतली होती.या फेरीवाल्यांना हटवण्यासाठी गेलेल्या पिंगळे यांच्यावर आरोपीने आपल्या हातातील धारदार चाकूने अचानक हल्ला केला.या हल्ल्यानंतर आरोपी अमरजीत यादव याला पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत.
तसेच त्याच्याजवळ असलेला कोयता देखील जप्त केला आहे.
धक्कादायक म्हणजे, 3 वर्षापूर्वी याच अमरजित यादवर हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

हे देखील वाचा :

Ahmadnagar Police Transfer | नगर जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल, 9 पोलीस निरीक्षकांसह 46 अधिकाऱ्यांच्या बदल्या

Pune News | पीएमपीएलची कात्रज-वांगणीवाडी, हडपसर-फुरसुंगी बससेवा सुरू

Rules Change | मोबाइल यूजर्ससाठी महत्वाची बातमी ! 1 सप्टेंबरपासून बदलतील ‘हे’ 5 नियम, जाणून घ्या तुमच्यावर कोणता होणार परिणाम

Related Posts