IMPIMP

The Great Indian Murder | ‘द ग्रेट इंडियन मर्डर’ : अजय देवगण निर्मित वेब सिरीजच्या ट्रेलरचे जोरदार स्वागत, अनेक सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया

by nagesh
The Great Indian Murder | the great indian murder trailer reactions madhuri dixit rakul preet hansal mehta athiya shetty all praise for ajay devgn produced web series

सरकारसत्ता ऑनलाइन – The Great Indian Murder | अजय देवगण ( Ajay Devgan ) 2022 मध्ये डिजनी प्लस हॉटस्टारवर ‘रुद्र – एज ऑफ
डार्कनेस’ ( Rudra- Edge Of Darkness ) या वेब सीरिजद्वारे ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे. मात्र त्याआधी त्याची वेब सीरिज द ग्रेट इंडियन मर्डर
4 फेब्रुवारी रोजी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. अजय देवगण फिल्म्सने प्रीती विनय सिन्हा ( Preeti Vinay Sinha ) यांच्या कंपनी RLE मीडियाच्या
सहकार्याने या मालिकेची निर्मिती केली आहे. अजय निर्मित वेब सिरीजचा ट्रेलर मंगळवारी रिलीज झाला, ज्याला सोशल मीडियावर उदंड प्रतिसाद
मिळाला आणि अनेक सेलिब्रिटींनी त्याच्या ट्रेलरचे कौतुक करत या मालिकेसाठी उत्सुकता व्यक्त केली. (The Great Indian Murder)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

‘द ग्रेट इंडियन मर्डर’ हे तिग्मांशु धुलिया ( Tigmanshu Dhuliya ) दिग्दर्शित, विकास स्वरूप ( Vikas Swaroop ) यांच्या ‘सस्पेन्स’-थ्रिलर कादंबरी
‘सिक्स सस्पेक्ट्सचे’ ( Six Suspects ) स्क्रीन रूपांतर आहे. या मालिकेत प्रतीक गांधी ( Pratik Gandhi ), ऋचा चढ्ढा ( Rucha Chadda ), आशुतोष
राणा ( Ashutosh Rana ), रघुबीर यादव ( Raghubir Yadav ), पाउली डॅम ( Pauli Dam ), जतिन गोस्वामी ( Jatin Goswami ), शशांक अरोरा ( Shashank Arora ) यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मालिकेची कथा विकी रायच्या ( Vicky Rai ) हत्येच्या रहस्यावर आधारित आहे. छत्तीसगड सरकारच्या मंत्र्याचा मुलगा.पण यातही राजकारणाचे रंग पाहायला मिळणार आहेत. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी तो सोशल मीडियावर शेअर केला आणि ही मालिका पाहण्याची इच्छा व्यक्त केली. माधुरी दीक्षित, रकुल प्रीत सिंग ( Rakul Preet Singh ), हंसल मेहता ( Hansal Mehta ), अथिया शेट्टी ( Athiya Shetty ), निम्रत कौर ( Nirmat Kaur ), राशी खन्ना ( Rashi Khanna ) आणि राहुल देव ( Rahul Dev ) यांनी ट्रेलर शेअर करून द ग्रेट इंडियन मर्डरच्या टीमचे अभिनंदन केले. (The Great Indian Murder)

द ग्रेट इंडियन मर्डरमध्ये प्रतीक गांधी यांनी सीबीआय अधिकारी सूरज यादवची भूमिका केली आहे, ज्याच्याकडे विकी राय हत्येचा तपास सोपवण्यात आला आहे. रिचा चढ्ढा DCP सुधा भारद्वाजच्या भूमिकेत आहे. त्याचबरोबर आशुतोष राणा यांनी मंत्री जगन्नाथ राय यांची भूमिका साकारली आहे.

Web Title : The Great Indian Murder | the great indian murder trailer reactions madhuri dixit rakul preet hansal mehta athiya shetty all praise for ajay devgn produced web series

हे देखील वाचा :

LIC Bhagya Lakshmi Plan | कमी उत्पन्न असलेल्यांसाठी LIC ची ‘ही’ योजना आहे एकदम खास, मॅच्युरिटवर मिळतो 110 टक्के रिटर्न

BJP | भाजपाचा गंभीर आरोप; म्हणाले – ‘राणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा 106 कोटींचा दरोडा’

Pimpri Corona Updates | रुग्णसंख्येत मोठी वाढ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 4094 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts