IMPIMP

Nagpur News | देवदर्शनासाठी आलेले 5 तरुण नदीत बुडाले, नागपूरमधील घटना

by bali123
Pune Crime News | Khadakwasla: 12-year-old boy drowned while going swimming

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन Nagpur News |  देवदर्शनासाठी आलेले पाच तरुण नागपूरमधील कन्हान नदीमध्ये (Nagpur Kanhan River) आंघोळीसाठी उतरले. परंतु नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने या तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे पाचही तरुण यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस (Digras Yavatmal) येथील होते आणि ते नागपूर (Nagpur News) येथे अम्मा दर्गा (Amma Dargah) येथे दर्शनासाठी आले होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील 12 तरुण अम्मा दर्गा येथे दर्शनासाठी आले होते. सकाळी 10 च्या सुमारास हे तरुण कन्हान नदीत आंघोळ करण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने एक तरुण बुडू लागला. त्यानंतर एक-एक करुन पाच तरुण पाण्यात बुडाले आणि वाहून गेले. ही घटना कन्हान पोलीस स्टेशच्या (Kanhan Police Station) हद्दीतील जुन्या कामाठी संकुलात घडली.

आज (रविवार) सकाळी यवतमाळ येथील हे तरुण दर्शनासाठी आले होते. यातील काहीजण आंघोळीसाठी नदीत उतरले. त्यावेळी नदीच्या पाण्याची पातळी जास्त होती तसेच नदीत एक प्रवाह वेगाने वाहत होता. आंघोळीसाठी उतरलेले तरुण मजा करत असताना ते बुडाले. बुडालेल्या तरुणांमध्ये सय्यद लकी (वय-22) अयाज बेग (वय-20), अबुंके बेग (वय-18), सिब्दान शेख (वय-21) खवडजा बेग (वय-17) यांचा समावेश आहे.

हे सर्व तरुण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले असून अद्याप त्यांचे मृतदेह सापडले नाहीत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या घटनास्थळी मृतदेह शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
पाच जणांचा शोध घेण्यासाठी स्थानिक नागरिकांची मदत घेतली आहे.

Web Title : Nagpur News | five youths drown in nagpur kanhan river

हे देखील वाचा :

Earthquake | कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी भुकंपाचा ‘धक्का’

Petrol Price Today | शुभ वार्ता ! पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा ‘कपात’

Baramati Accident | दुर्दैवी ! इंदापूर-बारामती राज्यमार्गावरील अपघातात दोघांचा मृत्यू 

Related Posts