IMPIMP

अवघ्या सव्वा महिन्याचा संसार ! पत्नीने ऐकली पती-प्रेमिकेसोबतची ऑडिओ क्लिप अन् झाली पत्नीची हत्या

by amol
pune crime | rape case in talegaon dabhade

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) नागपूरमध्ये विवाहबाह्य संबंध (Extramarital affair) समोर आल्यानंतर पतीने पत्नीची हत्या केली. पत्नीने पतीचे लग्नापूर्वीच्या प्रेमिकेसोबतचे संभाषण (ऑडिओ क्लिप) ऐकले होते. त्यामुळे याचा राग पतीला आला आणि याच रागातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली. ही हत्या करून आरोपी पती फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

नागपूरच्या भीमनगर येथे झालेल्या या घटनेमुळे तणावाचे वातावरण पसरले आहे. आरोपी पती अरविंद नागमोती याने पत्नी दीप्तीची हत्या केली. या दोघांच्याही लग्नाला फक्त सव्वा महिने झाले होते आणि लगचेच या दोघांमध्ये वाद होऊन पत्नीची हत्या करण्यात आली. दीप्तीने काही दिवसांपूर्वी तिचा पती आणि त्याची प्रेमिका या दोघांची ऑडिओ क्लिप ऐकली होती. त्यानंतर अरविंद आणि दीप्ती या दोघांमध्ये मोठा वाद झाला होता. दीप्तीने याबाबतची माहिती तिच्या कुटुंबियांना दिली.

तोंड दाबून हत्या

या वादानंतर अरविंद याने दीप्तीचे तोंड उशीने दाबून हत्या केली. जेव्हा दीप्तीचे कुटुंबिय घरी आले तेव्हा त्यांना याबाबतची माहिती समजली. त्यांनी लगेचच स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, या हत्येनंतर आरोपी पती फरार झाला आहे. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत.

Related Posts