IMPIMP

High Court Observation | घटस्फोट होण्यापूर्वी दुसऱ्या विवाहास उताविळ झालेली पत्नी क्रूरच

by nagesh
Pune Crime | Bail granted to accused in Pita case

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन High Court Observation | मुंबई हाय कोर्टाच्या नागपूर खंडपीठाने (nagpur bench of bombay high court) एका प्रकरणावर मोठा निर्वाळा (Observation) दिला आहे. घटस्फोट (Divorce) होण्याअगोदर दुसरा विवाह (Marriage) करण्यास आसुसलेली पत्नी क्रूरच असल्याचं निरीक्षण नागपूर खंडपीठानं दिलं आहे. एका प्रकरणात निकाल देताना हा मुद्दा नोंदवून पाटील घटस्फोट मंजूर केला आहे. न्या. अतुल चांदुरकर (Justice Atul Chandurkar) आणि न्या. गोविंद सानप (Justice Govind Sanap) यांनी निकाल दिला आहे. याप्रकरणी सुनावणी शुक्रवारी घेण्यात आली.

अधिक माहितीप्रमाणे, अकोला (Akola) येथील हे दांपत्य आहे. पत्नी क्रूरपणे वागत असल्यामुळे पतीने घटस्फाेट मिळविण्यासाठी कुटुंब कोर्टात याचिका दाखल केली होती. कुटुंब कोर्टाने पतीला घटस्फोट देण्यास नकार देऊन त्याला फक्त १ वर्षाकरिता पत्नीपासून वेगळं राहण्याची मुभा दिली. या निर्णयाविरुद्ध पतीने हाय कोर्टात आव्हान केले. आणि ते आव्हान मंजूर केले गेले. पतीने घटस्फोटासाठी याचिका दाखल केल्यानंतर पत्नीने पती आणि त्याच्या कुटूंबीयांविरुद्ध प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (Magistrate) कोर्टात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर पोलिसात देखील छळ केल्याची तक्रार केली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पत्नीने वैवाहिक अधिकार परत मिळविण्यासाठी याचिका दाखल केली नाही.
तसेच तिने घटस्फोटाचा निर्णय अंतिम होण्यापूर्वीच दुसऱ्या विवाहासाठी प्रयत्न करणे सुरू केले.
त्याकरिता त्या पत्नीने २ वैवाहिक वेबसाइटवर वैयक्तिक माहिती अपलोड केलीय.
यावरून तिची पतीसोबत राहण्याची आणि संसार करण्याची इच्छा नसल्याचं निष्पन्न होतं.
यावरून कुटुंब कोर्टाने पतीला घटस्फोट नाकारून चूक केली, असं हाय कोर्टाने पतीला दिलासा देताना नमूद केलं आहे.

दरम्यान, पत्नी पतीला बाहेरगावची नोकरी सोडून अकोला येथे राहण्याचा आग्रह करीत होती.
आई होण्यास नकार देत होती. एक दिवस ती अचानक सर्व दागिने घेऊन माहेरी निघून गेली.
त्यानंतर पत्नीने आणि तिच्या वडिलांनी भांडण करून पोलीस ठाण्यात (Police station) तक्रार दिली असल्याचा गंभीर आरोप (Allegations) देखील पतीकडून करण्यात आला होता.

Web Title : High Court Observation | wife who got married second time getting divorced cruel high court observation

हे देखील वाचा :

Rain in Maharashtra | राज्यात आगामी 5 दिवस मुसळधार पाऊस; जाणून घ्या पुण्यात काय असणार परिस्थिती

Pune Crime | काय सांगता ! होय, पुण्यात तब्बल 439 फ्लॅटमध्ये चोरी, जाणून घ्या प्रकरण

Satara Crime | सातार्‍यातील बालसुधारगृहात अल्पवयीन संशयिताची आत्महत्या

Related Posts