IMPIMP

Nagpur ZP Election Results | नागपूर जि.प.च्या सर्व 16 जागांचे निकाल हाती; काॅग्रेसची बाजी, भाजपला ‘दणका’

by nagesh
Maharashtra Politics | rohit tilak may be way towards bjp chandrakant patil pune political news politics

नागपूर :  सरकारसत्ता ऑनलाइन Nagpur ZP Election Results | नागपूर जिल्हा परिषदेच्या एकूण 16 जागेसाठी पोटनिवडणुकीचा (Nagpur ZP Election Results) निकाल आज जाहीर करण्यात आला. काँग्रेसचे 7, शेकापचा 1, भाजपचे 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 असे एकूण 16 उमेदवार पात्र झाले होते. या निवडणुकीत काॅग्रेसने विजयी घोडदौड राखली आहे. नागपूर जिल्हा परिषदेत काॅग्रेसने आपली सत्ता राखत भाजपला (BJP) एक मोठा धक्का दिला आहे. 16 पैकी काँग्रेसने (Congress) 9 जागेवर दणदणीत विजय मिळवला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

काँग्रेसने (Congress) नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत आपली विजयी कमान लावली आहे. तर, नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या जिल्ह्यातच भाजपला हार पत्करावी लागली आहे. या निवडणुकीत भाजपला फक्त 3 जागेवर विजय मिळवता आला आहे. या निवडणुकीत एकूण 16 उमेदवार रिंगणात उतरवले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत सर्वात जास्त फटका बसला असून राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 2 जागांवर विजय मिळवता आला. (Nagpur ZP Election Results)

दरम्यान, दुसरीकडे पंचायत समिती निकालांमध्ये देखील काँग्रेसने (Congress) मुसंडी मारली आहे. पंचायत समितीमध्ये काँग्रेसने 21 जागा मिळवत निर्विवाद यश मिळवलं तर भाजपच्या देखील दोन जागा वाढल्या त्यांना एकूण 6 जागेवर पंचायत समितीमध्ये निवडणूक जिंकता आल्या. तर दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) तीन जागांचा फटका बसत त्या वेळेस फक्त 2 जागा जिंकता आल्या. तर शिवसेनेला (Shiv Sena) जिल्हा परिषदमध्ये खाते उघडता आलं नाही.

जिल्हा परिषद – 16 जागा विजयी उमेदवार –

– नागपूर
गोधणी रेल्वे – कुंदा राऊत, -काँग्रेस विजयी

– हिंगणा
निलडोह – संजय जगताप, -काँग्रेस विजयी
इसासानी – अर्चना गिरी -भाजप विजयी
डिगडोह – रश्मी कोटगुले राष्ट्रवादी विजयी

– सावनेर
वाकोडी – ज्योती सिरसकर -काँग्रेस विजयी
केळवद – सुमित्रा कुंभारे -काँग्रेस विजयी

– मौदा
अरोली – योगेश देशमुख -काँग्रेस विजयी

– नरखेड
सावरगाव – पार्वता काळबांडे, -भाजप विजयी

– काटोल
पारडसिंगा – मीनाक्षी सरोदे,-भाजप विजयी,
येनुवा – समीर उमप, -शेकाप विजयी

– रामटेक
बोथलीया/पालोता – हरीश उईके -गोंडवाना गणतंत्र विजयी

– कुही
राजोना – अरुण हटवार -काँग्रेस विजयी

पारशिवनी
कऱ्हांभांड – अर्चना भोयर -काँग्रेस विजयी

– कामठी
गुमथाळा – दिनेश ढोले -काँग्रेस विजयी
वडोदा – अवंतिका लेकुरवाळे -काँग्रेस विजयी

जिल्हा परिषद निवडणूक निकाल –

काँग्रेस – 9
भाजप – 3
राष्ट्रवादी – 2
शेकाप – 1
गोंडवाना गणतंत्र – 1
शिवसेना – 0

Web Title :- Nagpur ZP Election Results | nagpur zilla parishad election all 16 seats result announced congress wins 9 bjp on 3 while ncp got 2 seat

हे देखील वाचा :

Nagpur ZP Election | देवेंद्र फडणवीस अन् नितीन गडकरींच्या जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का ! काँग्रेसचं वर्चस्व, 9 जागांवर दणदणीत विजय

Pune Crime | अंगावर वीज पडून 14 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू, पुण्यातील दुर्दैवी घटना

FB-WhatsApp Technical Error | FB-WhatsApp पुन्हा ‘गंडलं’ तर? जाणून घ्या ‘हे’ 5 सर्वोत्तम पर्याय अन् राहा जागाच्या संपर्कात

Related Posts