IMPIMP

महाविकास सरकारमधील दिग्गज मंत्री छगन भुजबळ यांना ‘कोरोना’ची लागण

by sikandershaikh
chhagan-bhujbal

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती भुजबळ यांनी ट्विट करून दिली आहे. संपर्कात आलेल्या लोकांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही भुजबळ यांनी केले आहे. मागील काही दिवसा बैठका आणि लग्न सोहळ्यासारख्या समारंभाला भुजबळ (Chhagan Bhujbal) उपस्थित राहिले असल्याने अनेकांची चिंता वाढली आहे.

रविवारी छगन भुजबळ यांनी सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती. तसेच साहित्य संमेलनाच्या सर्व पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. शिवाय राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत भुजबळांनी आमदार सरोज आहेर यांच्या कुटुंबातील लग्नातही हजेरी लावली होती. भुजबळ यांनी विविध बैठका आणि लग्नसोहळ्याला उपस्थिती लावलेली असल्याने अनेकांना कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे.

कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती ट्विट करून देताना भुजबळ यांनी म्हटले आहे की, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Related Posts