IMPIMP

खासदार डॉ. सिद्धेश्वर स्वामी यांच्या बनावट जातप्रमाणपत्राचे ‘उमरगा कनेक्शन’ !

by sikandershaikh
MP-Dr.-Siddheshwar-Swami

उस्मानाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) सोलापूरच्या गुन्हे अन्वेषण पथकाने डिग्गी येथील ग्रामपंचायत सदस्य गुरुबसय्या स्वामी  यांची भाजपचे खासदार डॉ. सिद्धेश्वर स्वामी (siddheshwar swamis) यांच्या बनावट जातप्रमाणपत्र संदर्भात चौकशी केली. या दरम्यान या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तहसीलदार संजय पवार यांची भेट घेऊन जात वैधता प्रमाणपत्रासाठी दाखल केलेल्या कागदपत्रांचीसुद्धा पाहणी केली. खासदार डॉ. सिद्धेश्वर स्वामी यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची जमवाजमव “उमरगा कनेक्शन” मधून केल्याची माहिती समोर आली आहे.

उमरगा तालुक्यातील तलमोड येथील गुरुबसय्या स्वामी हा जुन्या काळातील व्यक्ती एका पाटलाचे शेत बटईने करत होता, त्या अनुषंगाने शेतजमिनीवर त्याचे नाव आल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र समितीकडे हा पुरावा सादर करण्यात आला होता. या दरम्यान सिद्धेश्वर स्वामीचे जात प्रमाणपत्र अक्कलकोट तहसीलमधून निघाले व त्याचा पुरावा उमरगा कनेक्शनमधून जोडण्यात आला. हा सर्व प्रकार कोणत्या आधारे झाला, बनावटगिरी कशी झाली याचा सोक्षमोक्ष लावला जात आहे. पण यानंतर खासदार डॉ. सिद्धेश्वर स्वामी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

गुन्हे अन्वेषण शाखेची चौकशी

सोलापूरच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंके यांचे पथक चौकशीसाठी गुरुवारी उमरग्यात आले होते. या पथकाने डिग्गी ग्रामपंचायतीचे सदस्य, सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी गुरुबसय्या स्वामी यांची कसून चौकशी केली. सत्य बाहेर आणण्यासाठी या पथकाने त्यांच्याकडे नेमकी काय चौकशी केली. याची अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही.

चौकशी करण्यात आलेल्या गुरुबसय्या स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या पोलिसांनी चौकशी केली. खासदार डॉ. सिद्धेश्वर स्वामी यांना मी ओळखत नाही.
मात्र, मागच्या वर्षी समाज बांधव म्हणून माझ्याकडे काही व्यक्ती आल्या होत्या, त्यांच्याकडे तहसील कार्यालयातील नकला होत्या.
नकलेचा संदर्भ तलमोडचा असल्याने शपथपत्रासाठी तेथील चार लोकांशी संपर्क केला.
यात माझी एवढीच भूमिका होती, असे गुरुबसय्या स्वामी यांनी सांगितले. तसेच समितीने पुन्हा शुक्रवारी
सोलापूरला चौकशीसाठी बोलावले असून, आपण जाणार असल्याचेदेखील गुरुबसय्या स्वामी यांनी सांगितले.

तहसीलदार संजय पवार यांची माहिती

माझ्याकडे सोलापूरच्या एलसीबीचे अधिकारी आले होते, त्यांच्याकडून खासदार डॉ. सिद्धेश्वर स्वामी यांच्या
जात वैधता प्रमाणपत्रासाठी पुरावा म्हणून सादर केलेल्या मूळ कागदपत्राची मागणी करण्यात आली,
पण मूळ कागदपत्र मुंबई उच्च न्यायालयात दाखल असल्याने त्यांना सत्य प्रति देण्यात आल्या.

#Maratha Reservation : सरकारकडून कोर्टात अर्ज दाखल; काय म्हटलं आहे अर्जात

Related Posts