IMPIMP

धक्कादायक ! खंडणीसाठी पिंपरी महापालिका स्मार्ट सिटीच्या सर्व्हरवर सायबर हल्ला

by amol
cyber attack 27 servers pimpri municipal smart city project loss rs 5 crore

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन टीम – पिंपरी-चिंचवड महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कार्यालयातील 27 सर्व्हरवर हॅकर्सने सायबर हल्ला cyber attack केला आहे. सायबर अटॅक करून माहिती चोरल्याने तब्बल 5 कोटींचे नुकसान झाल्याचा दावा अधिका-यांनी केला आहे. रन्समवेअरने अटॅक करून डेटा इनक्रिप्ट केला आहे. डेटा हवा असल्यास बिटकॉइनच्या स्वरुपात हॅकर्सकडून खंडणीची मागणी केली जात असल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणी टेक महिंद्राचे प्रोग्राम मॅनेजर महेंद्र लाठी यांनी तक्रार दिल्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडे प्राप्त तक्रारीनुसार, हा प्रकार 26 फेब्रुवारी रोजी घडला आहे. या प्रकरणी मंगळवारी (दि. 9) तक्रार दिल्यानंतर ही घटना उजेडात आली. मात्र, तक्रार देण्यास विलंब का झाला, या बाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या सर्व प्रकारामुळे तब्बल 5 कोटीचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. निगडी येथे स्मार्ट सिटी प्रकल्पाची नुकतीच सुरुवात झाली होती. अधिकाऱ्यांनी पूर्ण काम सुरू केल नव्हते.
सॉफ्टवेअर लॉन्च करण्याच्या अगोदरच स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या 27 सर्व्हर मधून डेटा इनक्रिप्ट केल्याची माहिती समोर आली आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला करण्यात परदेशी हॅकरचा हात असल्याचा संशय सायबर पोलिसांनी व्यक्त केला आहे.
रेकी करून हा हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुख्यमंत्रिपदासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं नाव शर्यतीत !

रेखा जरे हत्याकांड प्रकरण : ॲड. उमेशचंद्र यादव यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

खासदार मोहन डेलकर आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून FIR दाखल; राजकीय वातावरण तापलं

अखेर पोलिस अधिकारी सचिन वाझेंची मुंबईच्या गुन्हे शाखेतून उचलबांगडी, गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

“शिवसेनेत सर्व्हे अन् प्रमुख पदासाठी मतदान झालं, तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुखही राहणार नाहीत” ! ‘या’ भाजप नेत्याची उद्धव ठाकरेंवर टीका

Related Posts