IMPIMP

इस्रायलमध्ये बोनफायर फेस्टिव्हलमध्ये चेंगराचेंगरी; ४४ जणांच्या मृत्यूची शक्यता

by Team Deccan Express
dozens people have been killed stampede religious bonfire festival israel

वृत्तसंस्था – कोरोनामुळे सर्वच देशांनी आतापर्यंत लॉकडाऊन लागू केला होता. मात्रा संपूर्ण देशात लसीकरण मोहीम पूर्ण झाल्यानंतर काही दिवसापूर्वीच इस्रायलने israel नो मास्कची घोषणा केली होती. त्यानंतर येथे बोनफायर फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. बऱ्याच कालावधीनंतर फेस्टिव्हलचे आयोजन केल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. दरम्यान यावेळी झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत ४४ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर १०० हुन अधिक लोक जखमी झाले आहेत.

पडळकर-खोत म्हणतात – ‘सांगलीचे पालकमंत्री निष्क्रीय तर शासन…’

दरम्यान, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोठी आपत्ती असल्याचे म्हटले असून लोकांच्या सलामतीसाठी प्रार्थना करतो असे म्हटले आहे. माउंट मेरनमध्ये स्टेडिअमच्या खुर्च्या मोडल्या. यानंतर लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाल्याचे मीडियाचा रिपोर्ट आहे. न्यूज चॅनल १२ व मॅगेन डेव्हीड अँडम रेस्क्यू सर्व्हिसने देखील ३८ जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. तसेच आणखी काही लोक हॉस्पिटलमध्ये मृत झाल्याचे म्हटले आहे. झीव्ह हॉस्पिटलने आपल्याकडे सहा जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटल्याने एकूण मृतांचा आकडा हा ४४ वर गेला आहे.

Coronavirus : कोरोनाच्या संकट काळामध्ये राज्यात सर्वोत्तम काम, बदनाम करण्याचे खूप प्रयत्न झाले पण…

यहुदींसाठी जगातील सर्वात पवित्र स्थळांपैकी एक असणाऱ्या ठिकाणी हि घटना घडली. हे एक वार्षिक तीर्थस्थळ आहे. दुसऱ्या शतकाचे संत रब्बी शिमोन बार योचाई यांच्या समाधीस्थळावर वार्षिक स्मरणोत्सवासाठी हजारो लोक यहूदी आले होते. रात्रभर प्रार्थना आणि डान्स केला जात होता. घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले असून त्यावरून या घटनेचे विदारक चित्र स्पष्ट होत आहे. व्हिडिओत तिथे उपस्थित प्रत्येकजण वाचण्यासाठी एकमेकांवर चढण्याचा प्रयत्न करत होता. पोलीस आणि वैद्यकीय कर्मचारी जखमींपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

४४ लोकांची प्रकृती नाजूक असून त्यांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी हेलिकॉप्टर मागविण्यात आले असल्याचे इस्त्रायलच्या israel आपत्कालीन विभागाचे प्रमुख मेगन डेविड अँडम यांनी सांगितले. पोलिसांनुसार पायऱ्यांवरून काही जण घसरले यामुळे तिथे धावपळ उडाली. इस्त्रायलने israel कोरोना निर्बंध हटविल्यानंतर तिथे हा पहिलाच मोठा कार्यक्रम होता.

Pravin Darekar : ‘आतातरी राजकारण थांबवा, लसीकरण निश्चित वेळेतच व्हायला हवं’

इस्त्रायल बनला पहिला देश
कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले होते. चीनमधील वुहान शहरातून कोरोनाच्या संक्रमणाला सुरुवात झाली होती. कोरोनाने अल्पावधीतच कोट्यवधी लोकांना आपल्या विळख्यात घेतले, तर लाखो लोकांना यामुळे जीव गमवावा लागला. इस्रायलमध्ये israel ८१ टक्के लोकांना कोरोना लस टोचण्यात आली आहे. यानंतर येथील प्रशासनाने मास्क न वापरण्याचा निर्णय घेतला. यामुळे इस्रायल हा जगातील पहिलाच देश ठरला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर येथील लोकांनी चेहऱ्यावरील मास्क काढले असून सोशल मीडियावरही आनंद व्यक्त केला आहे.

Also Read :

‘खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय’, ‘त्या’ ऑडिओ क्लिपवरुन गिरीश महाजनांचा शेलक्या शब्दांत खडसेंना टोला

ठाकरे सरकारची वचनपूर्ती, 9 लाख नोंदणीकृत कामगारांच्या खात्यात 137.61 कोटी रुपये जमा

पंकजा मुंडे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, ट्विट करुन दिली माहिती

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

फडणवीसांवर थेट दिल्लीतून निशाणा; प्रियांका गांधींनी व्हिडिओ ट्विट करून म्हटले…

Related Posts