IMPIMP

Pune : बांधकामात गुंतवणूक करण्याच्या अमिषाने 74 लाखाला गंडा, एकावर FIR दाखल

by bali123
हे देखील वाचा :

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – बांधकाम व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगून त्या बदल्यात 10 फ्लॅट किंवा चांगला मोबदला 6 महिन्याच्या आत देण्याचे आमिष दाखवून तब्बल 74 लाख रुपयांना गंडा fraud घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी रफीक मेहंमद शेख (रा. कोंढवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सचिन सोमनाथ जांभुळकर (वय 42 रा. जांभुळकरमळा, भैरोबानाला) यांनी कोंढवा पोलिसात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2011 पासून सुरु होता.

याबाबत पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार रफिक शेख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्य़ादी जांभुळकर यांना रफीक शेख यांने कोंढवा येथील ताहीर हाईटस या इमारतीच्या बांधकामामध्ये गुंतवणुक करण्यास सांगितले. त्या बदल्यात इमारतीमध्ये 10  फ्लॅट किंवा गुंतवणूक केलेल्या रकमेच्या योग्य मोबदला देतो, असे सांगितले. त्यानुसार शेख यांनी जांभुळकर यांच्याकडून वेळोवेळी चेक व रोख स्वरुपात 74 लाख 17 हजार घेतले. मात्र, इमारतीचे बांधकाम पूर्ण न करता त्यांना फ्लॅट दिले नाही. तसेच गुंतवणुक केलेली रक्कम परत न करता फसवणूक केली. याबाबत त्यांनी विचारणा केल्यावर शेख यांनी जांभुळकर यांना धमकी देऊन तुझे पैसे देत नाही,  मला त्रास दिला तर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर अधिक तपास करत आहेत.

नाना पटोलेंचा हल्लाबोल, म्हणाले – ‘ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपकडून वाझेंना टार्गेट

देवेंद्र फडणवीसांचा CM उद्धव ठाकरेंना प्रश्न, म्हणाले – ‘…मग हा निर्लज्जपणा कुणाचा म्हणायचा ?’

Coronavirus in Pune : टेन्शन वाढलं ! पुण्यात गेल्या 24 तासात 1352 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 13 जणांचा मृत्यू

Related Posts