IMPIMP

Google | गुगलने सुरू केली फोटो हाईड करण्याची सुविधा, अशा प्रकारे लपवा पर्सनल फोटोज

by omkar

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सरकारसत्ता ऑनलाइन – टेक्नॉलॉजी कंपनी गुगल (Google) ने मागील महिन्यात आपल्या Google I/O संमेलनात गुगल फोटोसाठी अनेक सुविधांची घोषणा केली होती. त्या अंतर्गत कंपनीने गुगल फोटोजसाठी लॉक्ड फोल्डर फीचर (Locked Folder Feature) सुविधा सुरू केली आहे. ज्यामुळे यूजर्स पासकोड किंवा फिंगरप्रिंट (Passcode or Fingerprint) ने सुरक्षित फोल्डरमध्ये आपली संवेदनशील छायाचित्रे किंवा व्हिडिओ हाईड म्हणजे लपवू शकतात.

Liquor sales | बार-रेस्टॉरंट आणि पार्ट्या बंद होऊनही वाढली दारूची विक्री, जाणून घ्या कारण

लॉक केलेल्या फोल्डरमध्ये सेव्ह केलेले फोटो किंवा व्हिडिओ फोटो ग्रिड, सर्च, अल्बम आणि रिसेंटमध्ये दिसणार नाहीत.
ते थर्ड पार्टी अ‍ॅप्समध्ये सुद्धा दिसणार नाहीत. मात्र, लपवलेल्या छायाचित्रांचा क्लाऊडवर बॅकअप घेता येणार नाही.
जर एखाद्या फोटो/व्हिडिओचा बॅकअप अगोदरच घेतलेला असेल तर गुगल ते क्लाऊडवरून हटवेल आणि केवळ स्थानिक रूपात फोल्डरमध्ये राहतील.

असा करू शकता वापर
यूजर्सला फीचरचा वापर करण्यासाठी त्यांना लायब्ररी युटिलिटीज लॉक्ड फोल्डरमध्ये जाऊन या नवीन लॉक्ड फोल्डरचा वापर सुरूकरावा लागेल.
एकदा वापरकर्त्याने यास सेट केल्यानंतर आपले सध्याचे फ़ोटो किंवा व्हिडिओ आपल्या लायब्ररीत टाकणे सुरू करू शकता.

गुगल कॅमेरा अ‍ॅपसुद्धा सेट करू शकता
यूजर्स नवीन फोटो किंवा व्हिडिओला थेट लॉक केलेल्या फोल्डरमध्ये सेव्ह करण्यासाठी गुगल कॅमेरा अ‍ॅप सुद्धा सेट करूशकतात.
या सुविधेचा वापर करण्यासाठी यूजर्सला कॅमेरा अ‍ॅप आपेन करावे लागेल.
वरील उजव्या कोपर्‍यात गॅलरी आयकॉनवर टॅप करावे लागेल आणि यादीतून ’लॉक्ड फोल्डर’ची निवड करावी लागेल.

सध्या केवळ Google Pixel स्मार्टफोन्सवर मिळेल सुविधा
ही सुविधा केवळ गुगल पिक्सल स्मार्टफोन्ससाठी जारी केली जात आहे,
ज्यामध्ये Google Pixel 3 grarO, Pixel 4 सीरीज आणि Pixel 5 आहे. मात्र, हे फीचर सध्या पिक्सल स्मार्टफोन्ससाठी एक्सक्लुझिव्ह बनले आहे.
कंपनीचे म्हणणे आहे की, ते इतर अँड्रॉईड डिव्हाईससाठी लॉक्ड फोल्डर रोल आऊट करतील आणि या वर्षी सुद्धा याचा वापर करू शकतील.

Five Police Officers Suspended | दोन पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलीस तडकाफडकी निलंबित; केली होती महाराष्ट्रातील भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याच्या जनसंपर्क कार्यालयाची बेकायदेशीर तपासणी

Petrol Price Today | ‘विक्रमी’ स्तरावर पोहचले पेट्रोल-डिझेल, परभणीत पेट्रोल 104.52 रूपये, जाणून घ्या राज्यातील इतर शहरातील दर

Sambhajiraje Meets Uadayanraje | उदयनराजेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, राजे म्हणाले –  ‘संभाजी राजेंच्या आंदोलनाला माझा पाठिंबा’ (Video)

Web Title : Google introduces the facility to hide photos in this way hide your personal photos and videos from others tech news

Related Posts