IMPIMP

सुट्टीवर गावाकडे आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे माओवाद्यांनी केले अपहरण

by Team Deccan Express
maoists kidnapping police sub inspector bijapur

छत्तीसगड : सुट्टीवर गावाकडे आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे माओवाद्यांनी अपहरण kidnapping केल्याची घटना समोर आली आहे. मुरली ताती असं या अधिकाऱ्याचे नाव आहे. छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील पालनार येथे हि घटना घडली असून एकच खळबळ उडाली आहे.

जगदलपूरला पोलीस उपनिरिक्षक नियुक्तीवर असलेले मुरली ताती हे सुट्टीवर गंगलुरला आपल्या गावाकडे आले होते. खरेदीसाठी ते पालनारच्या आठवडी बाजारात गेले असता तेथूनच माओवाद्यांनी त्यांचे अपहरण kidnapping केले. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

काही दिवसांपूर्वीच नाटयमय पद्धतीने माओवाद्यांनी जवानाचे अपहरण करुन सुटका केली होती. हि घटना ताजी असतानाच उपनिरीक्षकांचे अपहरण केल्याने सुरक्षा दलात खळबळ उडाली आहे. सुरक्षा दलांनी बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोहीम राबवली होती. काही तास चकमक सुरु होती. त्या दरम्यान कोब्रा जवान राकेश्वर सिंह मनहास हे बेपत्ता झाले होते. त्यानंतर माओवाद्यांनी ७ एप्रिल रोजी मनहास यांचा एक फोटो माओवाद्यांकडून जारी करण्यात आला होता. त्याशिवाय सीआरपीएफचे जवान राकेश्वर सिंह अद्याप जिवंत असल्याचा दावा केला होता. माओवाद्याच्या तावडीतून सहा दिवसानंतर राकेश्वर मनहार याची सुटका झाली होती.

फडणवीसांवर थेट दिल्लीतून निशाणा; प्रियांका गांधींनी व्हिडिओ ट्विट करून म्हटले…

माओवाद्यांनी जवानाची सुटका सरकारने गठण केलेल्या दोन सदस्यीय मध्यस्ती टीमचे सदस्य पद्मश्री धर्मपाल सैनी, गोंडवाना समाजाचे अध्यक्ष तेलम बोरैयासह शेकडो गावकऱ्यांच्या उपस्थितीत केली होती.

Also Read :

Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 3 लाखांच्या जवळपास नवीन रुग्ण, 2 हजाराहून अधिक मृत्यू

धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, 2003 नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी

तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल

Related Posts