IMPIMP

एकत्र जीवन-मरणाची दिली होती वचनं अन् अखेर एकाच चितेवर पती-पत्नीवर अंत्यसंस्कार

by sikandershaikh
Death

भोपाळ : वृत्तसंस्थामध्य प्रदेशात एक भीषण अपघात (accident) झाला होता. यामध्ये 51 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. या अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे त्यांचा विवाह गेल्याच वर्षी 8 जून, 2020 मध्ये झाला होता. या दोघांनीही एकत्र जीवन-मरणाची वचने घेतली होती. अखेर त्यांचा एकाच वेळी मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सीधी जिल्ह्याच्या शमी तालुक्याच्या गैवटा पंचायतमध्ये देवरी निवासी 25 वर्षीय अजय पनिका हे 23 वर्षीय पत्नी तपस्या हिच्यासह राहत होते. तपस्या एएनएमचा पेपर देण्यासाठी सीधीपासून सतना येथे जात होती. त्यादरम्यान झालेल्या अपघातात (accident) या दोघांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्या दोघांच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला आणि घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी मृतदेहाचा शोध सुरु केला. त्यानंतर तपस्याचा मृतदेह मंगळवारी 3 वाजता मिळाला. तर अजयचा मृतदेह 5 वाजता मिळाला. पोस्टमॉर्टमनंतर या दोघांचे मृतदेह रात्री 10 वाजता रुग्णवाहिकेद्वारे देवरी येथे पोहोचवण्यात आले.

गावावर शोककळा

अजय आणि तपस्या या दोघांचा अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त समजल्यानंतर गावावर शोककळा पसरली. अनेकांच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. अजयचे वडील गुजरातमध्ये असल्याने त्यांना मुलाच्या अंत्यविधीसाठी उपस्थित राहता आले नाही. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह जास्त वेळ अंत्यविधीशिवाय ठेवता येऊ शकत नव्हता. त्यामुळे अंत्यसंस्कार लवकर करण्यात आले होते.

Related Posts