IMPIMP

परभणी : शेतात पाणी देण्याच्या वादातून युवकाचा खून; तिघांना जन्मठेप

by amol
Pune Court | Keshav Argade granted bail in Khadakwasala hotel shooting case

परभणी : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)Parbhani murder case | 5 वर्षापूर्वी शेतात पाणी देण्याच्या वादातून एका तरुणाचा खून केल्याप्रकरणी येथील जिल्हा न्यायालयाने तिघांना बुधवारी (दि. 18) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

अजहर मसियोद्दीन असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर आरोपी रईसोद्दीन त्याची आई रौफाबी उर्फ गौरीबी, भाऊ अकबरोद्दीन असे शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी खिजर मसियोद्दीन यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. (Parbhani murder case)

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, येथील वांगी रोडवरील साईबाबा नगरात 13 डिसेंबर 2015 रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अजहर मसियोद्दीन याच्यासोबत शेतात पाणी देण्याच्या पाईपवरून आरोपींचा वाद झाला. या वादानंतर आरोपी रईसोद्दीन याने त्याचे वडील अमिरोद्दीन आणि आई रौफाबी ऊर्फ गौरीबी, भाऊ अकबरोद्दीन यांना घेऊन आखाड्यावर आला. त्यानंतर रईसोद्दीन ऊर्फ गुड्डू याने अजहर यास चाकूने भोसकले. त्यात तो जागीच ठार झाला. मसियोद्दीन हे अजहर यास वाचविण्यासाठी आले असता आरोपी अमिरोद्दीनने त्यांच्या पोटात देखील तलवार मारून गंभीर जखमी केले.

आरोपी गौरीबी हिने लोखंडी पाईपने अजहर यास डोक्यात मारहाण केली,
अशी तक्रार खिजर मसियोद्दीन यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
त्यावरुन नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
पोलीस निरीक्षक सुधाकर जगताप यांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
या प्रकरणी 18 फेब्रुवारीला जिल्हा व सत्र न्यायाधीश ओंकार देशमुख यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे 19 साक्षीदार तपासले.
प्रत्यक्ष घटना पाहणारे साक्षीदार व जखमी साक्षीदार, परिस्थितीजन्य पुरावा आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध
करण्यास पुरेसा आहे, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील सुभाषराव देशमुख हट्टेकर यांनी केला.
या प्रकरणातील आरोपी अमिरोद्दीन याचे खटला सुरू असताना निधन झाले.
त्यामुळे न्या.ओंकार देशमुख यांनी सुनावणीअंती इतर तिन्ही आरोपींना कलम 302 अन्वये जन्मठेप व
10 हजार रुपये दंड, सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

Related Posts