IMPIMP

Pune Crime News | पत्नी, मुलाच्या खुनानंतरही पती अद्याप बेपत्ता; ‘डबल मर्डर’चे गुढ अजूनही कायम

by bali123
Pune: After Going For Picnic 5-Year-Old Boy, His Mother Found Murder; Father Missing

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – सासवडजवळ पत्नीचा खून (murder) करुन मृतदेह टाकून दिल्यानंतर कात्रज घाटात मुलाचा गळा दाबून खून (murder) करुन मृतदेह फेकून दिला. त्यानंतर सातारा रोडवर भाड्याने घेतलेली कार सोडून दिलेली आढळून आली. दोन खुनानंतरही पती अबिद शेख (Abid Sheikh) याचा अद्याप काहीही तपास लागू शकला नाही. पुणे शहर पोलीस (Pune City Police) आणि पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) त्याचा शोध घेत आहेत. त्याचा तपास लागल्यावरच या मागील नेमके गुढ उलघडण्याची शक्यता आहे.

Anti-Corruption Bureau | 40 हजाराची लाच घेणारा सरपंच ACB जाळ्यात; आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा

प्राथमिक अंदाजानुसार ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) व शहर पोलिसांचा (Pune City Police) पती अबिद शेखवर (Abid Sheikh) संशय आहे. आलिया शेख (Alia Sheikh) (वय 35) आणि आयन शेख (ayan shaikh) (वय 5) असे खून झालेल्या दोघांची नावे आहेत. आबिद शेख (Abid Sheikh) हे मुळचे मध्य प्रदेशातील विदिशा येथील राहणारे आहेत. काही वर्षांपूर्वी ते पुण्यातील धानोरी, विमाननगर भागात रहात आहेत. अबिद शेख (Abid Sheikh) हा एका विमा कंपनीत मॅनेजर आहे.

11 जून रोजी हे तिघे जण भाड्याने कार घेऊन पिकनिकला (Picnic) गेले होते. त्यानंतर अबिद शेख याने भाड्याने घेतलेल्या कारचा कालावधी आणखी दोन दिवस वाढविला. सोमवारी रात्री ९ वाजता अबिदने आपल्या विदिशा येथील नातेवाईकांना फोन करुन अर्धा तासात घरी पोहचत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क तुटला. दुसर्‍या दिवशी मंगळवारी सकाळीही संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे विदिशातील नातेवाईकांनी ही बाब पुण्यात राहणार्‍या त्यांच्या चुलत भावाला सांगितली. ते शेख यांच्या घरी गेले तर तेथे घराला कुलूप आढळले. त्याचवेळी दुपारी भाड्याने कार दिलेल्या कंपनीचे अधिकारी घरी आले. त्यांनाही अबिद शेख (Abid Sheikh) यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. शेवटी या अधिकार्‍याने कारच्या डिव्हाईसवरुन शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा ती सातारा रोडला असल्याचे आढळून आले. सातारा रोडवरील एका चित्रपटगृहाबाहेर विरुद्ध दिशेला ही कार पार्क केल्याचे आढळून आले. सहकारनगर पोलिसांनी या कारची पाहणी केल्यावर त्यात काही रक्ताचे डाग आढळून आले.

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

दरम्यान, सासवडजवळील खळद येथे एका महिलेचा मृतदेह मंगळवारी आढळून आला होता. त्याचवेळी सायंकाळी कात्रज बोगद्याजवळ मुलाचा मृतदेह आढळून आला. हे दोघेही आई व मुलाचे मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, त्याचवेळी अबिद शेख यांचे काय झाले, याचा तपास लागू शकला नाही.

Chinese goods in India | चीन्यांना भारतीयांनी दिले सडेतोड उत्तर; 43 % लोकांनी खरेदी केल्या नाहीत चीनी वस्तू

अबिद शेख याने पत्नी व मुलाचा खून (murder) केला.
त्यानंतर सासवड जवळ पत्नीचा मृतदेह टाकून दिला.
तेथून तो कारने कात्रज घाटात आला.
तेथे मुलाचा मृतदेह टाकला.
त्यानंतर तो सातारा रोडवर आला.
तेथे गाडी पार्क करुन तो कोठेतरी पळून गेला असावा, असा पोलिसांचा संशय आहे.
अबिद शेख यानेच दोघांचा खून (murder) केला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
त्यादृष्टीने पोलीस शहरातील सीसीटीव्हींचे फुटेजची तपासणी करीत आहेत.

Related Posts