IMPIMP

मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल ! 65 अधिकाऱ्यांची एकाचवेळी उचलबांगडी

by pranjalishirish
Maharashtra IPS Officer Transfer | IPS Hemant Nagrale has been replaced by Sanjay Pandey as the new Commissioner of Police for Greater Mumbai

मुंबई: सचिन वाझे प्रकरण त्यानंतर परमबीर सिंग यांचे पत्र, त्यानंतर काही आयपीएस अधिकाऱयांवर होणारे आरोप यामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. या सर्व घडामोडीमुळे ठाकरे सरकार सावध झाले असून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत Mumbai Crime Branch  मोठे फेसर्वबद्दल करण्यात आले आहे. गुन्हे शाखेतील तब्बल ६५ अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. सरकार स्थापनेनंतर पहिल्यांदाच एवढे मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. दरम्यान या बदल्यांमध्ये एनआयए आणि एटीएसच्या चौकशीत अडकलेले एपीआय रियाजुद्दीन काझी, प्रकाश ओव्हाळ यांचाही समावेश आहे. काझी यांची सशस्त्र पोलीस दलात तर ओव्हाळ यांची मलबार हिल पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटके असलेल्या कार प्रकरणात सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. त्याचबरोबर त्या कारचे मालक मनसुख हिरेन हत्या प्रकरणातहि वाझे मुख्य आरोपी आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा पोलिसदलात रुजू करण्यापासून ते त्यांना महत्त्वाचा पदभर तसेच गुन्ह्याचा तपास देण्यापर्यंत या सर्व बाबी संशयाच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. त्यातच परमबीर सिंग यांच्या आरोपामुळे पोलीस दलात खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर सोमवारी गुन्हे  शाखेचे Mumbai Crime Branch  सहआयुक्त मिलिंद भारांबे, अपर पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. गुन्हे शाखेत ८ ते १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक आणि अन्य अंमलदार, तसेच ३ ते ५ वर्षे गुन्हे शाखेत Mumbai Crime Branch कार्यरत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षकांच्या याद्या तयार करून त्यांच्या बदल्यांबाबत चर्चा झाली. या अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा येण्यात आला. त्यानंतर मंगळवारी रात्री मुंबई पोलीस दलातील ८६ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. एकाचवेळी गुन्हे शाखेतील ६५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची पहिलीच वेळ आहे. या बदल्यांमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

GROHE Hurun Report : मंगल प्रभात लोढा देशातील सर्वात ‘श्रीमंत’ बिल्डर, जाणून घ्या त्यांच्यासह इतर मोठया ग्रुपच्या संपत्तीबाबत

दरम्यान, मुंबई पोलीस दलात पोलीस निरीक्षकपदी बढती मिळून नियुक्ती झालेले अधिकारी आणि नवीन इच्छुकांना गुन्हे शाखेत काम करण्याची संधी देण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे.

Aslo Read : 

खा. नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा शिवसेनेवर वारंवार टीका का करतात?

सबळ पुरावे बंद पाकिटात गृहसचिवांना दिलेत, योग्य कारवाई होईल – फडणवीस

ममता बॅनर्जींनी 10 वर्षांच्या सत्ताकाळात बंगालला कंगाल केले, रामदास आठवले यांची टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

फोन टॅपिंग करण्याचा अधिकार फडणवीसांना दिला कोणी; जयंत पाटलांचा सवाल

Related Posts