IMPIMP

Palghar Crime | धक्कादायक ! आश्रमशाळेत शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या

by nagesh
Pune Pimpri Crime | man suicides after not getting job in pimpri chinchwad of pune

पालघर : सरकारसत्ता ऑनलाइन  Palghar Crime | पालघर जिल्ह्यातील जव्हार (Jawhar) तालुक्यातील विनवळ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका आश्रमशाळेत (Ashram School) शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थिनीनं आत्महत्या (Suicide) केली आहे. संबंधित मुलीनं सोमवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Palghar Crime) केली आहे. तिने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अजून समजू शकले नाही. जव्हार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरु केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

मोनिका धाकलू मोरघा (Monica Dhaklu Morgha) असं आत्महत्या करणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं नाव आहे.
ती जव्हार तालुक्यातील विनवळ ढाकपाड येथील रहिवासी होती. सोमवारी घरी कोणी नसताना तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
मोनिकाच्या आत्महत्येची माहिती कळताच परिसरात एकच खळबळ उडाली. जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात मोनिकाचे शवविच्छेदन करण्यात आलं.
मृत मोनिका ही अनिवासी विद्यार्थिनी होती. तसेच ती नियमितपणे शाळेत जात होती. 20 नोव्हेंबर रोजी शनिवारी देखील ती नियमितपणे शाळेत गेली होती.
पण रविवारी सुट्टीच्या दिवशी घरी राहिल्यानंतर, सोमवारी ती नेहमी प्रमाणे शाळेत गेली नाही.
दरम्यान घरी कोणी नसताना, सायंकाळी 4 च्या सुमारास 15 वर्षीय अल्पवयीन मुलीनं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला अशी माहिती पोलिसांकडून देण्यात (Palghar Crime) आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला.
पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आत्महत्या (Sucide News) नेमकी कोणत्या कारणामुळे केली हे अजून समजू शकले नाही.
ही घटना घडल्यानंतर, सायंकाळी सातच्या सुमारास मोनिकाच्या आत्महत्येची माहिती तिच्या आश्रमशाळेत देण्यात आली.
तिने अचानक उचलेल्या टोकाच्या निर्णयामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title : Palghar Crime | 15 years old girl of ashram school commits suicide in palghar

हे देखील वाचा :

Pune Crime | पिस्टल बाळगणाऱ्या दोघांना सिंहगड पोलिसांकडून अटक; 2 पिस्टल 3 काडतुसे जप्त

Priyanka Chopra | प्रियंका चोप्राच्या ‘या’ कृत्याने निक जोनस आणि तिच्यात होणार डिवोर्स?

Aamna Sharif | बिकिनी मध्ये आमना शरीफचा बोल्ड अंदाज, सोशल मीडियाचं तापमान वाढवलं

Related Posts