IMPIMP

ST Bus Accident | 2 एसटी बसची समोरासमोर धडक; 50 प्रवासी जखमी

by nagesh
ST Bus Accident | st buses collide each other in palghar 50 passengers injured shocking video caught in cctv watch it

पालघर : सरकारसत्ता ऑनलाइन – ST Bus Accident | विक्रमगड तालुक्यातील (Vikramgad taluka) आलोंडे कोकणी पाडा येथील राईसमील नजीक दोन एसटीचा भीषण अपघात (ST Bus Accident) झाला आहे. डहाणू – ठाणे (Dahanu -Thane) आणि वाडा-जव्हार (Wada – Jawhar) या दोन्ही बसेस समोरासमोर वेगात धडकल्या आहेत. हा अपघात इतका भयानक होता की, दोन्ही बसेसचं मोठं नुकसान झालं आहे. विशेष म्हणजे या घटनेत कोणतेही जीवितहानी झाली नाही. मात्र, 50 प्रवासी किरकोळ (50 passengers injured) तसेच काही गंभीर जखमी झाले आहेत.

आलोंडे कोकणी पाडा येथील राईसमील जवळ या झालेल्या भीषण अपघाताचा (Accident) व्हिडीओ समोर आला आहे.
हा अपघात घटनास्थळावरील एका सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
आज सकाळी 9 च्या सुमारास विक्रमगड वरून वाडाकडे जाणारी डहाणू-ठाणे-सातारा तसेच वाड्यावरून येणारी जव्हार-वाडा बस कोकणी पाडा येथील राईसमिल जवळ समोरासमोर एकमेकांना वेगाने धडकल्या आहेत.

दरम्यान, या अपघाताचा लाईव्ह व्हिडीओ या सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आला असून अपघात नेमका कसा झाला हे व्हिडीओत दिसत आहे.
अपघातानंतर तेथील स्थानिकांच्या मदतीने एसटी (ST) मधील जखमी प्रवाशांना विक्रमगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Titel :- ST Bus Accident | st buses collide each other in palghar 50 passengers injured shocking video caught in cctv watch it

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

हे देखील वाचा :-

Pune Corporation Recruitment | इंजिनिअर्सची पुणे महापालिकेत होणार भरती; जाणून घ्या

Maharashtra IPS Transfer | राज्यातील 6 आयपीएस अधिकार्‍याची पदोन्नतीने पदस्थापना

Pune NCP | पालिकेतील सत्ताधाऱ्यांची ‘कायदेशीर’ गोची करणाऱ्या नगरसेवक अ‍ॅड.. भय्यासाहेब जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदी निवड

Related Posts