IMPIMP

Pune Pimpri Crime | लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार; वाकड परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime News | Stirring ! 22-year-old girl assaulted by leaving marijuana Ganja dust in her nose and mouth in kondhwa Pune rape case crime

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Crime | मला तू खूप आवडतेस, मी तुझ्यावर प्रेम करतो, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, असे
म्हणत एका 19 वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime)
जानेवारी 2021 ते 2 डिसेंबर या कालावधीत डांगे चौकातील ओयो लॉज व हिंजवडी फेज 1 येथील फर्निचरच्या दुकानात घडला.

याबाबत 19 वर्षांच्या पीडित मुलीने शुक्रवारी (दि.2) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिनेशकुमार लक्ष्मण सिंह (वय 27, रा. मान रोड, हिंजवडी फेज-1) याच्यावर आयपीसी 376, 376 (2) (एन), पॉक्सो अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अल्पवयीन असल्यापासून आरोपीने तिच्यावर अत्याचार केले.
पीडित मुलीची आई आरोपीच्या भावाच्या फर्निचरच्या दुकानात कामाला जात होती. त्यावेळी मुलीची आणि आरोपीची ओळख झाली. आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. मुलीने लग्नाबाबत विचारणा केली असता, सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याने ‘माझे घरचे आपल्या लग्नाला तयार नाहीत, मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही, यापुढे तू मला भेटायचे नाही तसेच फोन व मेसेजदेखील करायचा नाही,’ असे म्हणून लग्नास नकार दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.जे. गोडे करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Crime | Rape of a young woman with the lure of marriage; Incidents in Wakad area

हे देखील वाचा :

Shah Rukh Khan | “कोणीच मला अ‍ॅक्शनपटामध्ये घेत नव्हतं अन् आता…’; शाहरुख खानने केला मोठा खुलासा

IND vs BAN | वनडे मालिकेसाठी मोहम्मद शमीऐवजी ‘या’ गोलंदाजाला देण्यात आली संधी

Kolhapur Crime | चुलतीवर बलात्कारप्रकरणी पुतण्याला 10 वर्षांची सक्तमजुरी, कोल्हापूरमधील घटना

Related Posts