IMPIMP

महाविकास आघाडीसोबत 190 आमदार असल्याचा दावा; हसन मुश्रीफ यांनी दिले भाजपला ‘आव्हान’

by bali123
190 mlas with maha vikas aghadi says hasan mushrif

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाईन – जर आता विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेतली तर बहुमत सिद्ध होईलच तसेच १७० नव्हे तर १९० मते महाविकास आघाडीला मिळतील, असा दावा ग्रामविकास मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ hasan mushrif यांच्याकडून करण्यात आला आहे.

सचिन वाझे प्रकरण : खंडणीप्रकरणात मुख्यमंत्री ठाकरेंचा हात; खासदार नवनीत राणांचा लोकसभेत आरोप

काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बहुमत नसल्यानेच विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेण्यास महाविकास आघाडी टाळाटाळ करत आहे, असा आरोप केला होता व हिम्मत असेल तर ही निवडणूक घ्या असे आव्हानसुद्धा त्यांनी दिले होते. याला प्रत्युत्तर देताना हसन मुश्रीफ यांनी, ‘अधिवेशन काळात अनेक आमदार कोरोना बाधित होते. तीस ते पस्तीस आमदार अधिवेशनाला उपस्थित नव्हते. त्यामुळेच अध्यक्षपदाची निवडणूक घेतली नाही. ही निवडणूक घेण्याची आमची कधीही तयारी आहे. आमच्याकडे सध्या १७० आमदार आहेत आणि निवडणूक झाली तर आमच्या उमेदवाराला १९० मते मिळतील.’ असा दावासुद्धा केला आहे.

HM अनिल देशमुख यांच्यासाठी शरद पवार हे ’पावर बँक’ बनण्यामागे काय आहे ‘पॉलिटिक्स’?

यावेळी हसन मुश्रीफ hasan mushrif यांनी परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बवर देखील भाष्य केले. माफीचा साक्षीदार करण्यासाठीच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप केले असल्याचा दावा हसन मुश्रीफ यांच्याकडून करण्यात आला आहे. भाजपच्या नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकार पाडायचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे सरकार अस्थिर करण्यासाठी हे आरोप करण्यात येत आहे. भाजपच्या नेत्यांकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे पण राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखे हिकडे काहीच घडलं नाही. कायदा व सुव्यवस्था चांगली आहे. तसेच सरकारकडे बहुमत देखील आहे असेसुद्धा हसन मुश्रीफ म्हणाले.

हेही वाचा

Pandharpur : अजित पवारांच्या बैठकीला सभेचे स्वरूप, पोलिसांत FIR दाखल

‘हा’ कटाचाच भाग, शिवसेनेने सांगितला घटनाक्रम !

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तूर्तास राजीनामा नाहीच, राष्ट्रवादीने केले स्पष्ट

पंढरपूरसाठी जनतेच्या मनातीलच उमेदवार दिला आहे, अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत

पंढरपूरचा उमेदवार शरद पवार ठरवतील

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे’

RJ : धान्याच्या कोठीमध्ये अडकले मुले, गुदमरून 5 जणांचा मृत्यू

राज्यात राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवरून संजय राऊतांनी विरोधकांना फटकारलं ! म्हणाले…

Life Without Organs : ‘या’ 8 अवयवांशिवाय देखील जगू शकतो मनुष्य, शरीराचे ‘हे’ गुपितं करतील तुम्हाला हैराण, जाणून घ्या

Related Posts