IMPIMP

‘या’ कारणामुळे नगराध्यक्षांसह 31 जणांची भाजपला सोडचिठ्ठी; लवकरच करणार राष्ट्रवादी प्रवेश

by bali123
31 bjp worker resigned wadi nagarparishad nagpur

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन – भाजपचे bjp माजी जिल्हा महामंत्री व वाडीचे नगराध्यक्ष प्रेम झाडे यांच्यासह ३१ स्थानीय प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यावेळी त्यांनी पक्षाच्या पक्षपातीपणा व अन्यायकारक धोरणाचा निषेध केला आहे. त्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे यांच्यासोबत वाडीतील भाजपचे पदाधिकारी म्हणून कार्य करणारे गणेश राठोड, हिम्मत गडेकर, प्रकाश जुनघरे, मोहन खंडारे, जटाशंकर पांडे यांनी सोमवारी चर्चा करून हा निर्णय घेतला. यानंतर पक्षाच्याच आमदार व पदाधिकाऱ्यांनी उघडपणे ज्येष्ठ व कट्टर पदाधिकाऱ्यांवर अन्याय झाला असल्याची बाब स्पष्ट केली आहे. या गोष्टीची कल्पना देऊनसुद्धा आमदार समीर मेघे यांच्या दबावाखाली ज्येष्ठ जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून याबद्दल अजूनपर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. यामुळे हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रेम झाडे यांनी विविध आंदोलने, मोर्चे, वाडीबंदसारखे अनेक विषय हाताळून परिसरात पक्षाची प्रतिमा क्रियाशील ठेवली होती. पण गेल्या काही दिवसांपासून आमदार मेघे व प्रेम झाडे यांच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून मतभेत होत होते. वाडीतील दवाखान्याच्या मंजुरीसाठी प्रलंबित प्रस्ताव याचाही आमदारांनी पाठपुरावा मंत्रालय स्तरावर केला नसल्यामुळे वाडीतील एक लाख जनता आरोग्य सुविधेसाठी वंचित असल्याचा आरोप प्रेम झाडे यांच्याकडून करण्यात येत आहे. आमदार स्वतः भाजपचे असूनही हेतुपुरस्सर त्यांच्या वार्डला या निधीपासून वंचित ठेवण्यात आले होते. दरम्यान, एका लाच प्रकरणातही आमदारांची भूमिका संशयास्पद असल्याने वाडीतील पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता.

या सर्व गोष्टींचा अहवाल जिल्हा भाजपच्या bjp वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून, निवेदन देऊन वारंवार सांगूनदेखील त्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे ३१ पदाधिकाऱ्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांना भेटून या सर्व गोष्टींची कल्पना देऊन आपले राजीनामे सादर केले आहेत. यावर त्यांनी दोन दिवसांत योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले, पण आज ४ दिवस होऊनसुद्धा कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याचे प्रेम झाडे यांनी सांगितले आहे. त्यानंतर त्यांनी लवकरच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचे मत व्यक्त केले.

चंद्रकांत पाटील म्हणतात – ‘मुख्यमंत्री गप्प, तोपर्यंत विधानसभा ठप्प’

Related Posts