IMPIMP

ठाकरे सरकारची वचनपूर्ती, 9 लाख नोंदणीकृत कामगारांच्या खात्यात 137.61 कोटी रुपये जमा

by Team Deccan Express
9 lakh workers deposited rs 137 crore in the account state government information

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर गोरगरीब बांधकाम कामगारांना राज्य सरकारच्या state government वतीने आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार आता नोंदणीकृत असलेल्या 13 लाखांपैकी 9 लाख 17 हजार बांधकाम कामगारांना राज्य सरकारच्या state government वतीने अर्थसाह्य देण्यात आले आहे. मागील चार दिवासांमध्ये कामगार विभागाच्या वतीने 137 कोटी 61 लाख रुपयांचा निधी थेट कामगारांच्या बँक खात्यात जमा झाला असल्याची माहिती मंत्री हसन मश्रीफ यांनी दिली.

राज्यात कोरोना संकट असल्याने कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या काळात राज्यातील बांधकाम कामगारांना अर्थसाह्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला होता. या निर्णयानुसार महाराष्ट्र इमारत, बांधकाम व इतर कामगार कल्याणकारी मंडळातर्फे नोंदणीकृत कामगारांच्या खात्यात दीड हजार रुपयांचे अर्थसाह्य त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आले आहे, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली.

या निर्णयाचा फायदा राज्यातील नोंदणीकृत कामगारांना मिळत असून महाराष्ट्रात इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मागील वर्षी देखील कोरोना काळात नोंदणी बंधकाम कामगारांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली होती, असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

Also Read :

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

फडणवीसांवर थेट दिल्लीतून निशाणा; प्रियांका गांधींनी व्हिडिओ ट्विट करून म्हटले…

Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 3 लाखांच्या जवळपास नवीन रुग्ण, 2 हजाराहून अधिक मृत्यू

धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, 2003 नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी

तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल

Related Posts