IMPIMP

Abdul Sattar-Raosaheb Danve | रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांची दिल्लीत गळाभेट; राजकीय चर्चेला उधाण

by nagesh
Abdul Sattar Raosaheb Danve | bjp shivsena alliance news bjp leader and minister raosaheb danve and shivsena leader abdul sattar meet in delhi

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन- Abdul Sattar-Raosaheb Danve | शिवसनेचे नेते (Shivsana) आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी काल (मंगळवारी) भाजप-शिवसेना युतीविषयी मोठं विधान केलं होतं. भाजप-शिवसेना युतीचा (BJP-Shiv Sena) पूल केवळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हेच बांधू शकतात, असं विधान सत्तार यांनी केलं होतं. यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. यानंतर आता अब्दुल सत्तार यांनी भाजप नेते (BJP) आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची भेट घेतली. त्यामुळे आता राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चाला उधाण आलं आहे. (Abdul Sattar-Raosaheb Danve)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अब्दुल सत्तार म्हणाले होते की, ‘उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे राज्यातील कर्तव्यदक्ष राजकारणी आहेत. महाराष्ट्राचे नेतृत्व ते उत्तम प्रकारे
करत आहेत. तर नितीन गडकरी हे महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे नेते आहेत. म्हणून भाजप-शिवसेना युतीचा पूल जोडायचं त्यांनी मनावर घेतलं तर ते
उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडे जातील, त्यांना विनंती करतील, कारण शेवटी भाजप सेना युतीचा निर्णय उद्धव साहेबच घेऊ शकतात.’ असं ते म्हणाले
होते. (Abdul Sattar-Raosaheb Danve)

दरम्यान, त्यानंतर अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे आज थेट दिल्लीत पोहचले आहेत. दिल्ली दौऱ्यात त्यांनी आज सकाळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे
यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये काही चर्चा झाली. सत्तार यांनी केलेलं काल एक मोठं विधान आणि आज भाजप नेत्याची
घेतलेली भेट यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या भेटीवरुन आता राजकीय चर्चेला उत आला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : Abdul Sattar Raosaheb Danve | bjp shivsena alliance news bjp leader and minister raosaheb danve and shivsena leader abdul sattar meet in delhi

हे देखील वाचा :

Pune Crime | हॉटेलच्या व्यवसायातून 55 लाखाची फसवणूक, पुण्यात रवीअण्णा दांडेली आणि रमेश भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल

Pune Crime | पुणे पोलिसांकडून ‘कालीचरण महाराज’ला अटक, पथक रायपूरहून पुण्याकडे रवाना

Restrictions in Maharashtra | आज रात्रीपासून महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागणार? सरकारची टास्क फोर्सबरोबर बैठक संपली

Related Posts