IMPIMP

‘धनंजय मुंडे, मेहबुब शेख अन् आता संजय राठोड; कारवाई नेमकी का होत नाही ?’ : चंद्रकांत पाटील

by sikandershaikh
dhananjay-munde-chandrakant-patil-sanjay-rathod

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)dhananjay munde | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण (Pooja Chavan Suicide Case) मध्ये आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केला आहे. यानंतर त्यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. विविध मुद्द्यांवर भाष्य करत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. त्यांनी आक्रमक होऊन आपली भूमिका मांडली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही आता यावर भाष्य केलं आहे. पाटलांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी विविध मुद्दे मांडले आहेत.

‘मंत्र्यांवरील व पक्षातील नेत्यांवरील आरोपांची प्रकरणं सरकारकडून दाबली जातात’

चंद्रकांत पाटील म्हणाले, पूजा चव्हाण प्रकरणात अद्याप कारवाई का नाही. महाविकास आघाडी सरकारकडून मंत्र्यांवरील आणि पक्षातील नेत्यांवरील आरोपांची प्रकरणं दाबली जात आहेत असा आरोपही त्यांनी केला.

‘चित्रा वाघ यांच्या पतीची चौकशी आताच का सुरू होतेय ?’

पुढं बोलताना पाटील म्हणाले, धनंजय मुंडे (dhananjay munde) प्रकरणात कुठलीही कारवाई झालेली नाही. एका मंत्र्याच्या जावयाला ड्रग्जमध्ये पकडलं. त्याचीही कारवाई नाही. एका पक्षाच्या युवक अध्यक्षावर बलात्काराचा आरोप असूनही कुठली कारवाई झाली नाही. एक मंत्री कार्यकर्त्याला घरी जाऊन मारतो त्याचीही कारवाई नाही. पूजा चव्हाण प्रकरणी आवाज उठवणाऱ्या भाजपच्या चित्रा वाघ यांच्या पतीची चौकशी आताच का सुरू होतेय असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

‘कारवाईनं आम्ही घाबरणार नाही, चित्रा वाघ या वाघीण आहेत’

चंद्रकांत पाटील असंही म्हणाले, कार्यकर्त्यांवर, पक्षाच्या नेत्यांवर अशा प्रकराच्या कारवाई केल्या तरी आम्ही घाबरणार नाही. चित्रा वाघ या वाघीण आहेत. भाजप पक्ष पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे असंही ते आवर्जून म्हणाले.

नेमकं प्रकरण काय ?

2016 साली लाच मागितल्या प्रकरणी चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांना अटक करण्यात आली होती.
यानंतर या प्रकरणी तपास सुरू होता.
दरम्यान तपास सुरू असतानाच आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केला आहे.
किशोर वाघ यांच्या विविध शहरात असलेल्या मालमत्तांपैकी 90 टक्के मालमत्ता ही बेहिशोबी आहे असा दावा पोलिसांनी केला आहे.
किशोर वाघ यांच्याकडे 1 कोटींहून अधिकची बेहिशोबी मलमत्ता असल्याचा दावा केला जात आहे.

दरम्यान भाजपनं या कारवाईवरून महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.
चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतल्यानं राजकीय सूडबुद्धीनं ही कारवाई केली असा आरोप भाजप करत आहे.
या कारवाईनंतर अनेक भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

राज ठाकरे म्हणाले – ‘मी मास्क लावतंच नाही’, मंत्री विजय वडेट्टीवार म्हणतात…

Related Posts