‘आबां’ नंतर आदर्श गृहमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले, पण…’

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्याची माहिती दिली. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतर गृहमंत्री पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, म्हणून मी स्वत:हून पदापासून दूर होत असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी ट्विटद्वारे दिली.
शिवसेनेचे धारदार बाण ! म्हणाले – ‘देशातील निवडणूक आयोग ‘मृत’, EC ची भूमिका संशयास्पद’
गृहमंत्री श्री अनिल देशमुख साहेबांनी इतके वर्ष राजकीय कारकीर्द सांभाळली ज्यात त्यांच्यावर कधीच भ्रष्टाचारचे आरोप झाले नव्हते. मंत्रीमंडळात एक आदर्श गृहमंत्री म्हणुन आबानंतर त्यांच्याकडे पाहिले गेले.भाजपाच्या सुडाच्या राजकारणामुळे आज त्यांना राजीनामा द्यावा लागला.वेदनादायी.
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) April 5, 2021
अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्यावर 100 कोटी रुपये वसुल करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप झाल्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर आज न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे भाजपच्या गोटात आनंद व्यक्त केला जात आहे. भाजपने राज्यातील एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून या प्रकरणी दिलेल्या लढ्याला यश आल्याची प्रतिक्रिया भाजपने दिली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर टीका केली आहे.
अमोल मिटकरी यांनी भाजपवर टीका करताना म्हटले की, मंत्रीमंडळात स्वर्गीय माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्यानंतर एक आदर्श गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांच्याकडे पाहिले गेले. मात्र, भाजपच्या सुडाच्या राजकारणामुळे आज अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. तसेच एवढ्या वर्षाच्या राजकारणात अनिल देशमुख यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, असेही मिटकरी यांनी म्हटले आहे.
‘अनिल देशमुख यांना शरद पवारांचा आशीर्वाद असला तरी…’
अनिल देशमुख Anil Deshmukh यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांनी इतकी वर्षे राजकीय कारकीर्द सांभाळली ज्यात त्यांच्यावर कधीच भ्रष्टाचाराचे आरोप झाले नव्हते. मंत्रिमंडळात एक आदर्श गृहमंत्री म्हणून आबानंतर त्यांच्याकडे पाहिले गेले. भाजपच्या सुडाच्या राजकारणामुळे आज त्यांना राजीनामा द्यावा लागला… वेदनादायी’, असे ट्विट मिटकरी यांनी केले आहे.
मोठी बातमी ! अजितदादांना बालेकिल्ल्यातच शह देणार शिवसेना ?
ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाला अखेर भाजपचा पाठिंबा पण…
Param Bir Singh : उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर भाजपकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
‘त्या’ आदेशावरुन काँग्रेसकडून आदित्य ठाकरे ‘निशाण्या’वर, राज्यपालांनी दखल घेण्याची मागणी (व्हिडीओ)
हफ्ता वसुलीवर चंद्रकांत पाटील म्हणाले – ‘इयत्ता 8 वीचा विद्यार्थीही सांगेल सरकार प्रकरण दाबतंय’
Comments are closed.