IMPIMP

आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्या प्रकरण : देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाजवळ आंदोलन, पुतळा जाळला

by pranjalishirish
agitation near devendra fadnavis residence statue burned

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन-  राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांच्या नेतृत्वाखाली आज (बुधवार) सकाळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानाजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध केले. यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्या प्रकरणी फडणवीस यांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला.

100 कोटी खंडणी वसुलीच्या आरोपांनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि अनिल देशमुख यांची भेट, पुढं काय होणार?

नागपूर शहरातील बहुचर्चीत एकनाथ नमगडे हत्या प्रकरणात नाव समोर आलेला कुख्यात गुंड रणजीत सफेलकर याचे भाजपच्या काही नेत्यांशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. त्यामुळेच आज हे आंदोलन करण्यात आले असून देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis  यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव दोन दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिसांनी आदोलनकर्त्यांना फडणवीस Devendra Fadnavis  यांच्या घरापासून काही अंतरावर रोखले.

Gold Price Today : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण; जाणून घ्या पुणे-मुंबईतील आजचा भाव

कोण आहे रणजित सफेलकर ?

रणजित सफेलकर हा नगापूरमधील कुख्यात गुंड आहे. कामठी नगरपरिषदेमध्ये भाजपच्या तिकीटावर तो निवडून आला होता. त्यानंतर तो कामठीचा नगरउपाध्यक्ष होता. त्यामुळे त्याचे भाजप कनेक्शन असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.

घरचा आहेर देत ठाकरे सरकारमधील मंत्र्यानंच केलं ‘असं’ आवाहन, म्हणाले – ‘… तर अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढा’

काय आहे. निमगडे हत्या प्रकरण ?

6 सप्टेंबर 2016 मध्ये लाल ईमली मार्गावर दुचाकीवरुन ट्रीपल सिट आलेल्या हल्लेखोरांनी एकनाथ निमगडे यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करत होती. मात्र, दोन वर्षात या गुन्ह्यातील आरोपी सापडले नसल्याने हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मागील दहा वर्षातील अनडिटेक्ट मर्डर फाईल्स उघडल्या. गुन्हे शाखेने निमगडे हत्याकांडातील आरोपींचा शोध सुरु केला. त्यावेळी छिंदवाडा जेलमधील राजा नावाच्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत पोलिसांना सुगावा लागला. तोच धागा पकडून गुन्हे शाखेने निमगडे हत्याकांडाचा छडा लावला. आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांची वर्धा मार्गावर विमानतळाजवळ जवळपास 100 कोटींपेक्षा जास्त किमतीची साडेपाच एकर जागा आहे. याच जागेवरुन त्यांची 5 कोटी रुपयांची सुपारी देऊन हत्या करण्यात आली होती.

Aslo Read : 

‘आर्किटेक्ट’ एकनाथ निमगडे हत्या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचा अप्रत्यक्ष सहभाग, नागपुरात राष्ट्रवादीकडून आंदोलन

‘भाई जगताप असा टपोरी ज्याला ‘भाई’ बनायचं होतं पण… ; निलेश राणेंची टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

ममता बॅनर्जींनी 10 वर्षांच्या सत्ताकाळात बंगालला कंगाल केले, रामदास आठवले यांची टीका

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण

GROHE Hurun Report : मंगल प्रभात लोढा देशातील सर्वात ‘श्रीमंत’ बिल्डर, जाणून घ्या त्यांच्यासह इतर मोठया ग्रुपच्या संपत्तीबाबत

‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’

फोन टॅपिंग करण्याचा अधिकार फडणवीसांना दिला कोणी; जयंत पाटलांचा सवाल

गृहमंत्री देशमुख यांच्यावरील कथित आरोप प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल, चौकशीसाठी स्वतंत्र यंत्रणा नेमण्याची मागणी

Related Posts