IMPIMP

Ajit Pawar | कोरोनाबाबत निर्बंध, बुस्टर डोस आणि आरोग्य विभागाच्या परीक्षेसंदर्भात अजित पवारांचं महत्वाचं विधान; म्हणाले…

by nagesh
Ajit Pawar | Positivity rate of Pune city 18 percent, Ajit Pawar appeal to punekar take care

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Ajit Pawar | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज (शुक्रवारी) पुण्यात (Pune) आले होते. कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड (Pune and Pimpri Chinchwad) परिसरातील कोरोनाच्या नव्या ओमिक्राॅन व्हेरिएंटचे (Omicron Covid variant) रुग्ण बरे झाले असल्याची माहिती दिली. तसेच, पवार यांनी राज्यातील निर्बंधाविषयी, कोरोना लसीच्या बुस्टर डोस (Booster dose) आणि आरोग्य विभागाच्या परिक्षेबाबत (Health Department Exam) महत्वाचं विधान केलं.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये तूर्तास कोणताही बदल नाही. परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच, बुस्टर डोसबाबत विचार सुरु आहे. पण त्यासाठी देशपातळीवर केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात यावा, तसेच, सिरम इन्स्टिट्यूटकडे (serum institute of india pune) बुस्टर डोस (booster dose) उपलब्ध असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

पुढं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ‘आरोग्य विभागासारखी एवढी मोठी परीक्षा एमपीएससीकडून घेणे अशक्य आहे. आरोग्य भरतीत गैरप्रकार झाला आहे. यामध्ये जे दोषी असतील त्यांना अशी शिक्षा करु की, पुन्हा कोणाची पेपर फोडण्याची हिंमत होणार नाही, आरोग्य विभागाची गट ‘क’ आणि गट ‘ड’ ची परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी होतेय.’ त्याबाबत सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

दरम्यान, ‘दुसऱ्या डोसचे प्रमाण पहिल्या डोसच्या तुलनेत कमी आहे.
ओमिक्राॅनमुळे (Omicron variant) लोक दुसऱ्या डोसलाही प्रतिसाद द्यायला लागलेत.
पण जुन्नर, दौंड, पुरंदर आणि बारामती या 4 तालुक्यात डोसचे प्रमाण कमी आहे.
ते वाढवण्यास प्रशासनास सांगितलं आहे. येत्या आठवड्यात आम्ही या 4 तालुक्यात दुसर्‍या डोससाठी प्रयत्न करणार आहोत.
परंतु पुढच्या आठवड्यात या 4 तालुक्यातील नागरिकांनी याला प्रतिसाद नाही दिला
तर पुढील आठवड्यात आम्ही कडक निर्णय घेणार आहोत,’ असं देखील अजित पवार म्हटलं आहे.

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar on maharashtra lockdown pune omicron booster dose health dept exam

हे देखील वाचा :

Privatization of Airports | आगामी 5 वर्षात नागपुरसह आणखी 25 विमानतळांचे खासगीकरण, ‘ही’ आहे पूर्ण यादी

आपले Aadhaar Card मिनिटात करा ITR सोबत लिंक, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

Pune Crime | पुण्यातील सराईत वर्षासाठी स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 49 जणांवर कारवाई

Related Posts