Pandharpur : अजित पवार भाजप नेत्यांवर गरजले, म्हणाले-‘अरे तुला कुठं….’

पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाइन – पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील प्रचार शिगेला पोहोचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ajit pawar हे दोन दिवसांच्या पंढरपूर दौऱ्यावर आले आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भलके यांच्या प्रचारासाठी अजित पवार पंढरपूरमध्ये आले असून त्यांनी आज एक जाहिर सभा घेतली. यावेळी भाजपचे नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी अजित पवार ajit pawar यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला.
Chandrakant patil : ‘केंद्रीय आरोग्य मंत्र्यानी ठोक ठोक ठोकलंय’
यावेळी बोलताना अजित पवार ajit pawar यांनी आपल्या स्टाईलने भाषण केले. कल्याणराव काळे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर बोलताना अजित पवार म्हणाले, कल्याणरावांनी भाजप सोडूनये म्हणून काही नेते दोन-तीन दिवस कल्याणरावांच्या घरी जाऊन बसायचे. याच्या आधी कल्याणरावांची आठवण नाही आली. पण जेव्हा कानोसा आला की कल्याणराव परत चालले साहेबाकडं. काहीच्या पोटात दुखू लागलं. आरं तूला कुठं घालायची तिथ घाल नां, अशा शब्दांत अजित पवारांनी भाजप नेत्यांचा खरपूस समाचार घेतला.
‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करू नये यासाठी आता काय राहिलंय?’, चंद्रकांत पाटलांचा टोला
आपला ट्रॅक चुकला होता – काळे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर कल्याणराव काळे म्हणाले, मधल्या काळात आपला ट्रॅक चुकला होता, अशी टोलेबाजी त्यांनी केली. कल्याणराव काळे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कल्याणराव काळे यांचा संपूर्ण गटाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
चित्रा वाघ-रुपाली चाकणकर यांच्यात रंगला ‘कलगीतुरा’ !
परमबीर सिंग NIA च्या कार्यालयात ! सचिन वाझे, अँटिलिया प्रकरणी जबाब नोंदवणार
‘त्या’ वक्तव्यावरुन संजय निरुपम यांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाले -‘बहिरा नाचे आपन ताल…’
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज शरद पवारांची भेट घेणार
पंढरपूर पोटनिवडणुकीतील भाजपचे ‘स्टार’ प्रचारक कोरोनाबाधित
आ. शिवेंद्रराजे यांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘Lockdown लावून प्रशासनाकडून मोगलाई’
Comments are closed.