IMPIMP

‘त्या’ मुद्द्यावरून अजित पवारांनी केली विरोधकांची कोंडी, म्हणाले- ‘आधी 12 आमदारांची नावं, त्यानंतरच…’

by sikandershaikh
Ajit-pawar

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)ajit pawar | मुंबईत आजपासून (सोमवार दि 1 मार्च 2021) राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात करण्यात आली. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली विधीमंडळाचं कामकाज चालवलं जात आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात पहिल्याच दिवशी वाद पेटल्याचं दिसून आलं. विधीमंडळात वैधानिक विकास महामंडळाच्या पुनर्स्थापनेचा विषय गाजताना दिसत आहे. दरम्यान विधान परिषदेवर नियुक्त करण्यात येणाऱ्या 12 सदस्यांच्या नावाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी अद्याप मंजुरी न दिल्यानं अधिवेशनात पुन्हा या मुद्द्यावरून राजकारण तापल्याचं दिसत आहे.

वैधानिक विकास महामंडळाच्या पुनर्स्थापनेवरून वाद

वैधानिक विकास महामंडळावरून भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सरकारला धारेवर धरलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वाकयुद्ध झालं. मुनगंटीवारांच्या प्रश्नांना अजित पवारांनीही जशास तसं उत्तर दिलं.

’12 आमदारांची नावं जाहीर केल्यावर वैधानिक विकास महामंडळ घोषित करू’

अजित पवार म्हणाले, आमचं सरकार विदर्भ मराठवाडा विकास मंडळ झालं पाहिजे या मताचं आहे. 8 तारखेला बजेटमध्ये विकास मंडळाबद्दल जे ठरलं आहे त्याचे आकडे पहायला मिळतील. आमचं लवकरात लवकर करायचं ठरलं आहे. ज्या दिवशी राज्यपाल 12 आमदारांची नावं जाहीर करतील त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही विदर्भ आणि मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ घोषित करू. बजेटमध्ये तसा निधीही ठेवला आहे असंही पवारांनी सांगितलं.

‘फडणवीस-मुनगंटीवारां’नी व्यक्त केला संताप

पवारांच्या (ajit pawar) या उत्तरानं मुनगंटीवार यांनी आजच वैधानिक विकास महामंडळ जाहीर करा अशी मागणी केली.
देवेंद्र फडणवीस यांनीही पवारांना कडाडून विरोध करत त्यांच्यावर टीका केली.
मी अजितदादांचे आभार मानतो की, अजितदादांच्या मनात होतं तेच ओठी आलंय.
आमदारांच्या नावाखाली विकास मंडळ आणि मराठावाडा, विदर्भातील लाखो लोकांना ओलीस ठेवलं आहे का ?
किती राजकारण करत आहात अशी टीका त्यांनी केली.

बाळासाहेब थोरातांची जोरदार टीका, म्हणाले- ‘मोदी सरकारच्या बहिरेपणावर इलाज करणं गरजेचं’

Related Posts