IMPIMP

Ajit Pawar On Journalist | सवाल करताच अजित पवार वैतागले; म्हणाले – ‘हम बहुत गंभीर है, अभी स्टॅम्प पेपरपे लिखके दू’

by nagesh
Ajit Pawar | ncp mahesh tapase on shinde faction deepak kesarkar statement over ajit pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Ajit Pawar On Journalist | सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मध्य प्रदेश सरकारला ओबीसी आरक्षणासह (Madhya Pradesh OBC Political Reservation) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास मंजुरी दिली. यानंतर महाराष्ट्रातील ओबीसींच्या आरक्षणावरुन (Maharashtra OBC Political Reservation) आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजप (BJP) सध्या सत्ताधारी आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहे. दरम्यान, तुमचं सरकार ओबीसी आरक्षणाविषयी गंभीर आहे का? असा सवाल एका पत्रकाराने विचारला असता त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे. (Ajit Pawar On Journalist)

मुंबईत (Mumbai) आज (गुरुवारी) अजित पवार यांची पत्रकार परिषद होती, त्यावेळी एका पत्रकाराने सवाल केला. तुमचं सरकार ओबीसी आरक्षणाविषयी गंभीर आहे का? असा प्रश्न करताच अजित पवार म्हणाले, ”बहोत गंभीर है, बहुत गंभीर है, स्टॅम्प पे लिखके दू”. असं म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. (Ajit Pawar On Journalist)

त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, ”मध्य प्रदेशच्या धर्तीवर आपण ओबीसी आरक्षण राखण्यासाठी प्रभाग रचनेचे अधिकारी सरकारकडे घेणारे विधेयक आणले.
हे विधेयक एकमताने मंजूर झाले आणि कायदा अस्तित्वात आला. आता जे झालं ते झालं.
पण महाविकास आघाडी सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी आग्रही असल्याचे,” ते म्हणाले.

पुढे अजित पवार म्हणाले, ”आम्ही जयंत कुमार बांठिया यांच्या नेतृत्त्वाखाली समिती स्थापन केली आहे.
या समितीचे काम जोरात सुरु आहे. जून महिन्यापर्यंत आपल्याला इम्पेरिकल डेटा प्राप्त होईल, अशी आशा आहे.
त्यानंतर राज्य सरकार चांगला वकील नेमून आणि महाधिवक्त्यांशी चर्चा करुन सर्वोच्च न्यायालयात जाऊ,” असं ते म्हणाले.

Web Title :- Ajit Pawar On Journalist | NCP leader and dcm ajit pawar sasy mahavikas aghadi government is serious about obc reservation in local bodies election ajit pawar on journalist news

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Aurangabad Crime | 20 वर्षाच्या तरुणीच्या डोक्यात रॉडने वार करुन गळा आवळून खून, मित्र फरार

Pune Crime | पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांच्यावर गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण

Ajit Pawar on Shivsena | अजित पवारांचा शिवसेनेला टोला; म्हणाले – ‘सरकार चालवताना भांड्याला भांडे लागतेच पण..’

Related Posts