IMPIMP

Ajit Pawar On Raj Thackeray | राज ठाकरेंच्या सभेनंतर अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘राज ठाकरेंनी हवं ते म्हणावं, आम्हाला मात्र…’

by Team Deccan Express
Ajit Pawar On Raj Thackeray | ncp leader and deputy minister ajit pawar slams mns leader raj thackeray over his pune speech

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Ajit Pawar On Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (MNS Chief Raj Thackeray) आज पुण्यात घेतलेल्या सभेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. यामध्ये त्यांनी अयोध्या दौरा (Ayodhya Tour) स्थगित (Postponed) करण्याच्या मुद्यावर भाष्य करताना राज्यातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या धोरणांवर टीका करताना ‘तुम्ही बाळासाहेबांची क्रेडिबिलिटी (Credibility) कमी करत आहात’ अशा शब्दांत राज ठाकरेंनी टीका केली. त्यांच्या या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Ajit Pawar On Raj Thackeray)

अजित पवार म्हणाले, त्यांना जे म्हणायचंय ते त्यांनी म्हणाव. आम्हाला विकासाच्या मुद्यावर बोलायचंय. मी काल देखील जळगाव जामवत, शहापूर, डहाणू, सिंदखेड राजा अशा ज्या ज्या ठिकाणी गेलो, तिथे माझी भूमिका तीच राहिली आहे. ज्याच्यातून महाराष्ट्रातल्या मुलांना रोजगार निर्माण होणार आहे, ज्याच्यातून जातीय सलोखा निर्माण होणार आहे. ज्याच्यातून कायदा-सुव्यवस्थेचा (Law and Order) मुद्दा हाताळण्यात पोलिसांना (Maharashtra Police) मदत होणार आहे, त्या गोष्टीला देखील महत्त्व देऊन ना, असं आवाहन त्यांनी प्रतिक्रिया देताना मध्यमांसमोर केलं.

काय म्हणाले राज ठाकरे ?

जनेतेने राजकारण समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक वेळी तुम्हाला गृहीत धरुन हे चालणार.
काल शिवसेनेतलं (Shivsena) कुणी तरी बोललं की, महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) हे पाहिलं असतं तर बाळासाहेबांना आनंद झाला असता.
याच्यावर कहर म्हणजे शरद पवार म्हणतायत आम्ही सकाळी भांडायचो आणि संध्याकाळी जेवायला एकत्र बसायचो.
तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची (Balasaheb Thackeray) क्रेडिबिलिटी घालवताय.
शिवसेनेला कळत नाहीये की तुम्ही कुणाबरोबर राहत आहात. लोकांना वाटेल यांचं खोटं खोटं भांडण चालायचं,
असं म्हणत राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

Web Title :- ncp leader and deputy minister ajit pawar slams mns leader raj thackeray over his pune speech

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts