IMPIMP

Ajit Pawar on Shivsena | अजित पवारांचा शिवसेनेला टोला; म्हणाले – ‘सरकार चालवताना भांड्याला भांडे लागतेच पण..’

by nagesh
Ajit Pawar on Shivsena | ajit pawar attack on shivsena we will descuss with cm about mla funds

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Ajit Pawar on Shivsena | राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) अनेक कारणावरुन सतत कुजबूज होताना दिसत आहे. तिन्ही पक्षाचे सरकार असले तरी काही विषयावरुन नाराजी नाट्य देखील घडत असते. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिवसेनेला (Shivsena) टोला लगावला आहे. ‘विकास निधीबाबत आमच्याही आमदारांची नाराजी आहे. शेवटी सरकार चालवत असताना काही तरी भांड्याला भांडे लागतेच पण त्याची बाहेर करणं कितपत योग्य आहे?’ असा टोला त्यांनी लगावला. (Ajit Pawar on Shivsena)

”राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला एक अतिरिक्त जागा देऊ असे म्हटले होते. त्यानुसार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची चर्चा झाली असावी. संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांना शरद पवार यांनी पाठींबा दिला याविषयी काहीच माहित नसल्याचे,” अजित पवार यांनी म्हटले. तसेच, ‘महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विकासनिधी देताना, पैसे देताना समन्वय साधावा. तसेच अपक्ष आमदारांनाही जास्त निधी देण्याच्या सूचना केल्या होत्या. विकास निधीबाबत काही तक्रारी असल्यास त्यावर बाहेर बोलण्यापेक्षा मला येऊन सांगावे.” (Ajit Pawar on Shivsena)

”विकास निधीबाबत आमच्याही आमदारांची नाराजी आहे. शेवटी सरकार चालवत असताना काही तरी भांड्याला भांडे लागतेच पण त्याची बाहेर करणं कितपत योग्य आहे?,” असा टोला अजित पवार यांनी शिवसेनेला लगावला आहे.
तर, आज खरीप पिकासंदर्भात मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक आहे यावेळी त्यांच्यासोबत या विषयावर बोलणार असल्याचं देखील पवार यांनी सांगितलं आहे,

ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले, ”विरोधी पक्षनेते राज्यात ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात आम्ही सर्वजण एकत्र आहोत.
त्यात मतभेद नाही, असेल नेहमी सांगतात. पण, कोर्टात काही वेगळा निकाल लागला की सरकार कमी पडले असा आरोप करतात.
त्यांची नेमकी भूमिका काय हेच समजत नाही,” असा टोलाही अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लगावला.
तसेच, राज्यात ओबीसी राजकीय आरक्षण कायम ठेवूनच निवडणूक व्हाव्यात यासाठी राज्य सरकारची आग्रही भूमिका असेल.
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत आमची चर्चा सुरु असल्याचं ते म्हणाले.

Web Title :- Ajit Pawar on Shivsena | ajit pawar attack on shivsena we will descuss with cm about mla funds

Pankaja Munde On Ketaki Chitale Topic | केतकी चितळे वादग्रस्त पोस्ट प्रकरणी पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘पवार साहेबांनी…’

EPFO Update | UAN मेंबर पोर्टलवर प्रोफाईल पिक्चर अशाप्रकारे करू शकतात अपलोड, याशिवाय होणार नाही ई-नॉमिनेशन

EPFO | एक मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या तुमच्या पीएफ खात्यात (PF Account) किती आहे शिल्लक, ईपीएफओने सांगितली पद्धत

Related Posts