IMPIMP

‘त्या’ वक्तव्याबाबत अजित पवारांनी संजय राऊतांना फटकारले; म्हणाले – ‘मिठाचा खडा टाकण्याचे काम कुणी करू नये’

by bali123
ajit pawar on shivsena mp sanjay raut samana rokhthok on home minister

बारामती : सरकारसत्ता ऑनलाइन – शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना अपघाताने गृहमंत्रीपद मिळाले, असे जाहीरपणे लिखाण केले. संजय राऊतांनी रोखठोकमधून केलेल्या लिखाणामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. पण, महाविकास आघाडी सरकार हे तीन पक्षांचे आहे. त्यामुळे कुणी मिठाचा खडा टाकण्याचे काम करु नये, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार ajit pawar यांनी संजय राऊत यांना फटकारलं आहे.

Sanjay Raut : … म्हणून 12 आमदारांची अद्याप नियुक्ती नाही

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. बारामतीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बारामतीत आढावा बैठक घेतली. त्यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात पत्रकारांशी संवाद सधताना संजय राऊत यांच्या विधानाबाबत विचारले असता अजित पवार यांनी संजय राऊत यांना फटकारले.

वसुलीच्या आरोपावरून आपल्याच लोकांकडून मिळाला घरचा ‘आहेर’ ! अनिल देशमुख म्हणाले – ‘मुख्यमंत्र्यांकडे केली होती मागणी, सेवानिवृत्त न्यायाधीशांकडून केली जावी चौकशी’

संजय राऊत यांच्या विधानावर बोलताना अजित पवार ajit pawar म्हणाले, राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे शिवसेनेत कुणाला मंत्रिपद द्यायचे याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतात. काँग्रेसमध्ये देखील मंत्रीपद देण्याचा अधिकार सोनिया गांधी यांना आहे. त्या प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणाला मंत्रीपद देयचे याचा अधिकार शरद पवार यांना आहे. शरद पवार यांना 50 वर्षाचा राजकीय अनुभव आहे. त्यामुळे कोणाला मंत्रीपद द्यायचे आणि कोणता विभाग द्यायचा हे तेच ठरवतात. इतरांनी वक्तव्य केलं तर समजू शकतो. पण महाविकास आघाडीमध्ये असताना मान्यवरांनी एकमेकांना अडचणीत आणण्याचे वक्तव्य करु नये, असे अजित पवार यांनी म्हटले.

Mann ki Baat : ‘देशाने वाजवलेल्या टाळ्या आणि थाळ्या कोरोना योद्ध्यांच्या हृदयाला स्पर्श करुन गेल्या’

अजित पवार ajit pawar पुढे म्हणाले, संजय राऊत यांना चांगले माहित आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार हेच निर्णय घेत असतात. शरद पवार यांनी या राज्याचे मुख्यमंत्री कोण असावे, हे काँग्रेससोबत आघाडी असताना ठरवले आहे. यामुळे कुणी मिठाचा खडा टाकण्याचे काम करु नये, अशा शब्दात अजित पवार यांनी संजय राऊत यांना फटकारलं आहे.

Sanjay Raut : अनिल देशमुखांना अपघाताने गृहमंत्रिपद मिळाले

काय म्हणाले संजय राऊत ?
जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रीपद घेण्यास नकार दिल्याने अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद मिळाले. देशमुख यांना मिळालेले गृहमंत्री पद हे अपाघाने मिळाले आहे. या पदाची एक प्रतिष्ठा व रुबाब आणि दहशत आहे. आर.आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळ्यात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. त्यातच पोलीस खाते आधिच बदनाम आहे. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो.

मोठी बातमी ! 15 एप्रिल पर्यंत Lockdown वाढवला, राज्यात निर्बंध आणखी कडक; रात्री 8 नंतर बाहेर पडल्यास…

अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विनाकारण पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावे. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशीचे जाहीर आदेश देणे बरोबर नाही. ‘सौ सोनार की एक लोहार की’ असे वर्तन गृहमंत्र्यांचे असले पाहिजे. पोलीस खात्याचे नेतृत्तव फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होत असतो हे विसरुन कसे चालेल ? असा टोला संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांना लगावला आहे.

Also Read

भाजपच्या सर्व आरोपांना उत्तर देत काँग्रेसनं विचारला प्रश्न – ‘…मग फडणवीसांनी 6.3 GB चा कोणता पेनड्राईव्ह दाखवला?’

होय, दीपाली चव्हाणांना वाईट वागणूक मिळत होती, वन्यजीव रक्षकाचा दावा

Gold Rates Today : सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या नवे दर

PM Narendra Modi : ‘बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणं, ही माझ्या जीवनातील पहिली

‘आणखी किती फेकणार मोदीजी, हद झाली राव’, काँग्रेसकडून पंतप्रधानांवर खरमरीत टीका

Ashok Chavan : ‘आरक्षण मर्यादेचा प्रश्न केंद्र सरकारकडून अनुत्तरीत, राज्याला सकारात्मक निकाल अपेक्षित’

PM मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध, 4 आंदोलकांचा मृत्यू

दुर्दैवी ! फॅशन स्ट्रीटची आग विझवून घरी परतताना कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

… म्हणून देवेंद्र फडणवीस घाबरलेत, नवाब मलिकांचा पलटवार


‘IPS शुक्ला यांच्या अहवालामुळे ठाकरे सरकारची चांगलीच तंतरलीय, खंडणीखोरीचे बिंग फुटले’; भाजप नेत्याची टीका

Rohit Pawar : ‘भाजप सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार होत होते का ?’

Related Posts