IMPIMP

सबळ पुरावे बंद पाकिटात गृहसचिवांना दिलेत, योग्य कारवाई होईल – फडणवीस

by bali123
Devendra Fadnavis

सरकारसत्ता ऑनलाइन टिम – राज्याच्या पोलीस दलातील बदल्यांचे रॅकेट तत्कालीन गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी उघडकीस आणले होते. पण त्यावर मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांनी कोणतीची कारवाई केली नाही. त्यामुळे मी या प्रकरणातील सर्व पुरावे एका बंद लिफाफ्यात envelope केंद्रीय गृहसचिवांना दिले आहेत. तसेच या प्रकरणातील माझ्याकडे असलेली सर्व माहिती मी त्यांना सांगितली आहे. तसेच याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणीही केल्याची माहिती  विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यावर केंद्रीय गृहसचिवांनी माझे सर्व बोलणे ऐकून घेऊन तसेच सर्व पुराव्यांची पडताळणी करुन लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांच्या भेटीनंतर  फडणवीस प्रसार माध्यमांशी बोलत होते. फडणवीस म्हणाले की, राज्याच्या पोलीस दलात  बदल्याचे रॅकेट सुरू असून यासंदर्भातील कॉल रेकॉर्डिंग आणि इतर सबळ पुराव्याचा अहवाल तत्कालीन गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी 25 ऑगस्ट 2020 रोजी  राज्य सरकारला दिला होता. पण त्यावर अद्याप कोणतीच कारवाई सरकाने का केली नाही. कारवाई न करता सरकार नेमकं कुणाला  वाचवू पाहायतंय? असा सवाल फडणीस यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच याचे सारे पुरावे आता केंद्रीय गृहसचिवांना दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Also Read :

सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! वेतनात घसघशीत वाढ करुन वाढवले निवृत्तीचे वय, ‘या’ सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मोठ्या शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’ ची शक्यता ?

वेळ आल्यावर ‘करेक्ट’ कार्यक्रम’ ! ‘बदलीनंतर परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले? – राष्ट्रवादी

‘ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !’ अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

बीडमध्ये NCP चा शिवसेनेला धक्का ! महत्त्वाच्या नेत्यांसह 101 प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मी नाही त्याने मला सोडले … ! सुशांतच्या मृत्यूच्या 9 महिन्यांनंतर अंकिता लोखंडेने दिली त्यांच्या ब्रेकअपवर प्रतिक्रिया

‘मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत !’ रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Related Posts